अकोट येथील डॉ.उदय सांगळुदकरांचे लिव्हर स्टडीजच्या राष्ट्रीय परिसंवादात विशेष सादरीकरण

0
2176
Google search engine
Google search engine

अकोट(संतोष विणके) – येथील युवा प्रतिभावंत डॉ.उदय सांगळुदकर यांना नुकतेच लिव्हर स्टडीजच्या राष्ट्रीय परिसंवादासाठी दिल्ली येथे विशेष वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.दिल्ली येथे संपन्न झालेल्या या राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये देशभरातुन आलेल्या प्रसिद्ध डॉक्टर तथा तज्ञांनसमोर त्यांनी लिव्हर स्टडीजवर त्यांचे अभ्यास सादरीकरण केले.विशेष म्हणजे डॉक्टर उदय सांगळुदकर हे DNB सुपर स्पेशलिटी मध्ये गॅस्ट्रोएट्रोलॉजीस्ट करणारे अकोला जिल्ह्यातील बहुदा एकमेव असे वैद्यकीय तज्ञ असणार आहेत.त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले असून बार्क मुंबई येथून ते DNB सुपरस्पेशालीटी करताहेत. शहरातील प्रतिष्ठित नागरिक अरुण सांगळुदकर यांचे ते चिरंजीव आहेत .आकोट शहरातुन शालेय शिक्षण घेत DNB सुपरस्पेशलिटी सारख्या वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या पदवीद्वारे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात नाव मिळवले आहे.त्यांनी या उपलब्धीतुन राष्ट्रीय स्तरावर दिमाखदारपणे आकोटचे नाव झळकावले आहे. त्यांच्या या यशामुळं अकोट वासियांना अभिमानास्पद वाटत असून शहरातील वैद्यकीय क्षेत्रासह सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.