संत अच्युत महाराज भागवत समिती अकोटच्या वतीने श्रीमद् भागवत कथेचे आयोजन….

0
1258

अकोट(संतोष विणके)- संत अच्युत महाराज भागवत समिती अकोटच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी पन ३०/०८/२०१८ ते ०५/०९/२०१८ पर्यंत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन श्रीराम मंदिर संस्थान,शनवारा येथे दुपारी ३.३० ते ६ आयोजन या दरम्यान करण्यात आले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमुतीँ गाडगे महाराज, गुरुमाऊली श्रीसंत अच्युत महाराज यांच्या परम कृपेने गेल्या १४वर्षी पासून आकोट नगरात श्रीसंत अच्युत महाराज भागवत कथेचे आयोजन करीत आहे.
श्रीसंत अच्युत महाराजांचे परमशिष्य हभप अँड. सचिन देव महाराज यांचे भागवतावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. वेळः दुपारी ३.३०ते ६
या प्रवचनाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीसंत अच्युत महाराज भागवत कथा समिती आकोट यांनी केले आहे.