केरळच्या पुरग्रस्तासाठी सरसावले आकोटातील कोवळे हात ; दिवालीबेन सेदानी स्कुलच्या विद्यार्थ्यांची संवेदनशिलता

0
1053
Google search engine
Google search engine

अकोट(संतोष विणके)केरळच्या पुरग्रस्तासाठी आकोटातील दिवालीबेन सेदानी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी११ हजार रुपायांची आर्थिक मदत करत लहान कोवळी मनं हे मोठ्यांपेक्षा जास्त संवेदनशिल व जबाबदार असल्याचे दाखवुन दिले. नेहमीच सामाजिक क्षेञात व शैक्षणिक क्षेञात अकोट मधील अग्रक्रम असलेली स्व.दिवालीबेन सेदाणी स्कूल मधील ८ ते १० वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थीनी आपल्या खाऊ मधुन केरळ मधील पुरग्रस्त भागासाठी ११०००/- रुपयांची रोख रक्कम जमा करुन आज जिल्हाधीकारी कार्यलयात,अकोला येथे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांड्ये यांच्या जवळ सुपुर्त केली.जिल्हाअधिकारी यांनी मुलांमधील सामाजिक व आपुलकीचे स्नेह व संवेदनशीलतेचे कौतुक केले.तसेच संस्थेच्या अध्यक्षा सौ.स्मिता सेदाणी यांच्या मार्गदर्शनखाली मुख्याध्यापकांसह प्रशांत मंगळे,स्नेहल अभंयकर,कु.चंचल पितांबरवाले व निहाल राजगुरु व विद्यार्थीनी यांच्या हस्ते निधी गोळा करुन देण्यात आला. शाळेत व अकोट परीसरात त्याच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक केल्या जात आहे._