बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र श्रीरंग ओव्हाळ बीड एलसीबी च्या जाळ्यात

0
1106

प्रतिनिधी:- दिपक गित्ते/ नितीन ढाकणे

दिवसभरात बीड एसीबीची दुसरी यशस्वी कारवाई.

बीड : सेवानिवृत्त व्यक्तीचा सेवापट परभणी जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र श्रीरंग ओव्हाळ यास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले.

राजेंद्र ओव्हाळ हा प्राथमिक शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक आहे. एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या सेवापटात पूर्ण नोंदी घेऊन तो सेवापट परभणी जिल्हा परिषदेत पाठविण्यासाठी ओव्हाळने त्यांच्याकडे पाच हजाराची लाच मागितली होती. यांची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेस प्राप्त झाली होती. सदर तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर बीड एसीबीने बुधवारी दुपारी बीडच्या शिवाजी चौकातील नगर रोडवरील एका हॉटेलच्या बाजूस सापळा लावून राजेंद्र ओव्हाळला पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ओव्हाळवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हि कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस कर्मचारी दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, बापू बनसोडे, विकास मुंडे, अमोल बागलाने, राकेश ठाकूर, सखाराम घोलप, भरत गारदे, नदीम आणि म्हेत्रे यांनी पार पाडली.