तहसीलदार शिल्पा बोबडे यांचा सत्कार आणि निरोप समारंभ कार्यक्रम

0
1771
Google search engine
Google search engine

सत्कार आणि निरोप समारंभ कार्यक्रमात भरवले तहसील दार सोबत इतर नागरिक,पत्रकार संघ आणि जगदंब पब्लिक स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला तहसीलदार शिल्पा बोबडे यांचा सत्कार आणि निरोप समारंभ..

चांदुर बाजार:-प्रतिनिधी
अधिकारी येतात आणि जातात. परंतु ते कायम कुणाच्या स्मरणात राहत नाहीत. एखादा अधिकारी आपल्या कार्यशैलीने कर्मचाऱ्यांमध्ये स्थान निर्माण करतो आणि सामान्यांचे प्रश्न स्वत:चे समजून पोटतिडकीने निवारण करतो, अशा अधिकाऱ्याला निरोप देताना त्यांच्या अधिनस्थ सारे अधिकारी आणि कर्मचारी भावविभोर होतात, ती त्यांच्या यशाची आणि लोकप्रियतेची पावती ठरते, असाच काहीसा प्रकार सोमवारी स्थानिक तिरुपती लॉन वरील कार्यक्रम दरम्यान मावळते चांदुर बाजार येथील तालुका दंडाधिकारी तहसीलदार शिल्पा बोबडे  यांना निरोप देताना पाहायला मिळाला.
तहसीलदार शिल्पा बोबडे  यांना सोमवारी  छोटेखानी समारंभात निरोप देण्यात आला. यावेळी त्यांचे पती अमित वैराळे,यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस स्टेशन चांदुर बाजार चे ठाणेदार अजय आकरे,शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार मुकुंद कवाडे,ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन परदेशी,आसेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार नंदू काळे,नायब तहसीलदार नीलिमा मते,नायब तहसिलदार विजय गोहाड, नायब तहसीलदार अर्जुन वांदे,चांदुर बाजार नगर अध्यक्ष रवींद्र पवार,जगदंब पब्लिक स्कुल चे अध्यक्ष विनोद कोरडे पत्रकार संघ चे प्रतिनिधी राजाभाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शील ,शाल देऊन पत्रकार बांधव आणि विनोद कोरडे यांच्या मित्र परिवार तहसीलदार शिल्पा बोबडे यांचा सत्कार केला.
2वर्ष 9 महिन्याच्या कालावधी मध्ये  शाश्वत विकासाच्या दृष्टीने चांदुर बाजार तालुका व्हिजन डॉक्युमेंट तयार करून अंमलबजावणी सुरू केली. आर्थिक स्वयंपूर्णतेसाठी मनरेगा प्लस ही संकल्पना मांडली. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणी व प्रशिक्षणावर भर देऊन सक्षम प्रशासन ही संकल्पना रूजू केली.
तसेच जवळपास 3 वर्षांमध्ये त्यांनी 100%वर महसूल ची वसुली पूर्ण केली.यावेळी त्याच्या सत्कार करतांना. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघटना शाखा चांदुर बाजार, अखिल भारतीय पत्रकार संघटना,तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक,मान्यवर उपस्थित होते.तर मी तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रेम आणि जीवहळ्याचे नाते जोडून जाते आहे.जाण्याचे मला पण दुःख होते असल्याचे तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी सांगितले.