स्वच्छतागृह व बाजारपेठ सौदर्यीकरण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन

0
883
Google search engine
Google search engine

बुलडाणा:- राहुल निर्मळ-

सध्या देशभरात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छतेवर खूप मोठ्या प्रमाणावर जाहिराती व खर्च सुरु असताना आसलगाव बाजार येथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

आसलगाव बाजार हे जळगाव जामोद तालुक्यातील अतिशय महत्वाचे व सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गावात जाण्याचा मुख्य रस्ता हा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण होते. तसेच या बाजारपेठेत नदी वाहत असल्यामुळे हि घाण नदीपात्रात जाते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डबके साचल्यामुळे डेंगू सारखे आजार उदभवतात.
बाजारपेठेच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे स्वच्छतागृह नसल्यामुळे उघड्यावर प्रसाधन या ठिकाणी नागरिकांकडून केल्या जाते. याचा नाहक त्रास गावातील महिलांना करावा लागतो. त्याचसोबत दुर्गंधीमुळे गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
यासाठी स्वच्छता गृह उभारण्यात यावे तसेच बाजारपेठेचे सौदर्यीकरण करून बाजारपेठेतील गावच्या मुख्य रस्त्यातील नदीपत्रावर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज दि 31 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या ठिय्या आंदोलनाची दखल ग्रा. सचिव यांना देत या मागण्यांची तात्काळ दखल घेण्यात येईल अशी लेखिपत्राद्वारे कमी दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
यानंतर दिलेल्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेडकडून अभिनव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राहुल वाघ, रुस्तम दाभाडे, अविनाश चौधरी, रोशन बुले, आकाश आटोळे, उद्धव वाघ, गजानन वाघ, शुभम ठाकरे, सागर गावंडे, शुभम गावंडे, विशाल भोंबे, जनार्धन भिवटे , आकाश कावस्कर , प्रशांत गावंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकते उपस्थित होते.