मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळावी.- डाॕ. पी.व्ही.जाधव

0
796

-परवाज उर्दू शाळेला मान्यवरांच्या भेटी-

आकोट/संतोष विणके

मुलांना मुक्त वातावरणात अध्ययन अनुभव घेवू द्या..त्यातून ते शिकतील.बोलतील वाचतील ,चिंतन,मनन करुन व्यक्त होतील.त्यांना अभिव्यक्त होण्याची पुरेशी संधी मिळाली पाहीजे.असे विचार जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डाॕ.पी.व्ही.जाधव यांनी मांडले*आकोट नगरपरिषद द्वारा संचालित परवाज उर्दू शाळेच्या शिक्षकांशी संवाद साधतांना डाॕ जाधव बोलत होते. या शाळेतील नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र तथा या शाळेतील विविध शै.उपक्रमाची पाहणी करण्यासाठी त्यांनी या शाळेला आवर्जून भेट दिली.यावेळी प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर , विषय सहाय्यक गोपाल सुरे,डाॕ.भिमसिंग राठोड शहर समन्वयक रितेश निलेवार आदी उपस्थित होते.या शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चातून सर्व वर्गखोल्या डिजिटल केल्यात. ज्ञानरचनावादी शै साहित्याची निर्मिती करुन आकर्षक व कल्पकतेने सुशोभन करीत गुणवत्तेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. विविधांगी शैक्षणिक उपक्रम राबविणारी शाळा म्हणून या शाळेचा लौकिक राज्यभरात पोहोचला.त्यासाठी शिक्षकवृंदाच्या परिश्रमाचं कौतुक डाॕ जाधव यांनी केले.आणि विषयांकित उद् बोधन केले.दरम्यान डाॕ जाधवांनी सर्व वर्गातील मुलांशी संवाद साधून गुणवत्तेची पडताळणी केली.तथा येथील शैक्षणिक उपक्रमांच्या उपयुक्तते बाबत समाधान व्यक्त केले.येथील नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची उपयुक्तता वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. नंदकिशोर हिंगणकर व गोपाल सुरे यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक अफजल हुसेन यांनी स्मृती चिन्ह देवून पाहूण्याचे स्वागत केले.संचालन मो.शाकीर यांनी तर आभार प्रदर्शन मुजुबुर रहमान यांनी केले.याप्रसंगी असलम खान, कलीमाेदिन, माेहिबूर रहमान,अ. खालीद,मूजिबूर रहमान , नजमूलहूदा,माे.शाकीर,शमसूज्जमा,माे. अलताफ शरफ इकबाल, हबीबाेद्दिन,फरहाना अंजूम,चांद बीउपस्थित होते.