आकोटात मतदार नोंदणी बाबत कार्यशाळा

0
977
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके- दिनांक 01/09/2018 रोजी दिनांक 01/01/2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत (SVEEP) श्री.शिवाजी महाविद्याल,दर्यापुर रोड अकोट येथे महाविद्यालयीन विद्यार्थांची मतदार नोंदणी बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले.सदर कार्यशाळेमध्‍ये मतदार नोंदणी विषयी विद्यार्थांमध्‍ये मतदानाचे महत्‍व समजावून सांगण्‍यात आले. तसेच मतदार नोंदणी चे नमुना 6, 7, 8 व 8अ सोबत जोडावयाचे कागदपत्रे तसेच सदरचे अर्ज हे ऑफलाईन स्‍वरुपात मतदान केन्‍द्रस्‍तरीय अधिकारी, तहसिल कार्यालय अकोट व तेल्‍हारा येथील निवडणुक विभागामध्‍ये किंवा ऑनलाईन स्‍वरुपात NVSP.IN या संकेत स्‍थळावर भरण्‍याबाबतचे प्रत्‍यक्ष प्रात्‍यक्षीक दाखवून मार्गदर्शन करण्‍यात आले. सदर कार्यशाळेमध्‍ये अध्‍यक्ष म्‍हणुन श्री.अंबादास कुलट, प्राचार्य श्री.शिवाजी महाविद्यालय अकोट हे तर प्रमुख मार्गदर्शक मा.विश्‍वनाथ घुगे तहसिलदार अकोट तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी,028-अकोट विधानसभा मतदार संघ अकोट हे होते. सदर कार्यशाळेकरिता तहसिल कार्यालय,अकोट येथील श्री.राजेश गुरव, निवडणुक नायब तहसिलदार, श्री.विलास टोलमारे, अव्‍वल कारकुन निवडणुक विभाग, श्री.सिध्‍दांत वानखडे, संगणक परिचालक, श्री.शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्‍यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी,भावी मतदार उपस्थितीत होते. सदर कार्यशाळेचे आभार प्रदर्शन कु.शितल माकोडे यांनी केले.