अवघ्या काही तासांतच विद्युत डी.पी.ची दुरुस्ती – ‘प्रहार’ ने ‘महावितरण’ कार्यालयात दिला होता आंदोलन करण्याचा इशारा

0
1364
Google search engine
Google search engine

ग्रामस्त प्रफुल्लीत : कापूसतळणी,जावेकर यांचे शेत येथील खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत.

वृत्ताची दखल : अचलपुर येथील ग्रामीण कार्यालयात तिव्र आंदोलनाच्या इशार्याने खळबळ.

अचलपुर  / 

अचलपुर विद्युत वितरण कंपनी च्या उपकार्यालय अंतर्गत कापूसतळणी गावातील वाढीव विद्युत रोहित्र दुरुस्ती करीता कार्यान्वयीत करण्यास टाळाटाळ केल्याने तसेच जुने विद्युत रोहित्र प्रमाणापेक्षा अधिक दाबामुळे जळून नादुरुस्त अवस्थेमुळे ऐन हंगामाच्या काळात या गावातील विद्युत पुरवठा बंद होता. वारंवार विनवणी करूनही विद्युत कंपनी कडून दाद न मिळाल्याने येथील शेतकरी व ग्रामस्त कमालीचे त्रस्त होते. अखेर प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदिप वडतकर तसेच कापूसतळणी वासीयांच्या या समस्येची दखल घेत महावितरण ला आठ दिवसांचा अवधी देऊन समस्या मार्गी न लावल्यास कार्यालयात आंदोलनाचा इशार्यानेच महावितरण हरकतीत आले आहे. कापूसतळणी येथील रोहीत्र दुरुस्तीचे काम महाविरण कंपनीने युध्दस्तरावर सुरु केल्याने ग्रामस्थांसह शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.विद्युत पुरवठ्या अभावी हंगामी पिकांचे अतोणात नुकसान होत असल्याने व याबाबत वारंवार सुचित करूनही विद्युत वितरण कंपनी कडून कुठलीच कार्यवाही होत नसल्यामुळे प्रहार संघटनेने या प्रश्नी आक्रमक भुमिका घेतली होती.

 

 

 

 

आठ दिवसात नादुरुस्त विद्युत रोहित्र दुरूस्ती करुन न बसवील्यास कार्यालयीन कामकाज बंद पाडण्यासह कार्यालयात आंदोलनाचा ‘अल्टीमेटम’ प्रहार चे जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर , उपजिल्हा शंभु मालठाने, प्रदिप निमकाडे, मोहन जावेकर, प्रविण मळसने, यांनी विद्युत वितरण कंपनीला दिला होता.अचलपुर  वितरण कंपनीच्या उप कार्यालया अंतर्गत कापूसतळणी या गावातील विद्युत रोहीत्रे काही दिवसांपुर्वी जास्त दाबामुळे जळाल्याने विद्युत पुरवठा बंद होता. विद्युत पुरवठा बंद असल्याने ऐन हंगामाच्या दिवसांत शेतकऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी हंगामी पिकांची शेतकऱ्यांना भिस्त आहे.परंतू विजेचा पुरवठा बंद असल्याने व सध्या शेतीसाठी पाण्याची अत्यंत गरज असल्याने  विजेचा पुरवठा नियमित करण्यासाठी शेतकऱ्यांच्या व्यथा सांगून सुध्दा विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नादुरुस्त रोहीत्र दूरुस्त करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने शेतकर्यांची कोंडी झाली होती.विद्युत पुरवठा सुरळीत करावा.नादुरुस्त डीपी दूरुस्त करुन विद्युत पुरवठा त्वरित सुरु करावा या करीता प्रहारच्या वतीने अखेरचा आठ दिवसांचा अल्टीमेटम देताच महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनोने यांनी संबंधीत यंत्रणेला आदेश देऊन अवघ्या काही तासातच विद्युत वितरणचे विद्युत पुरवठा सुरळीत केला आहे. प्रहारची या प्रश्ना आक्रमक भुमिका व प्रसारमाध्यमांनी घेतलेली दखल या मुळेच गावातील विद्युत पुरवठ्याची समस्या मार्गी लागल्याची प्रतिक्रिया व समाधान यावेळी कापूसतळणी ग्रामस्तांनी व्यक्त केली.