गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा कसा करावा ?

0
1048
Google search engine
Google search engine

 

 

सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति ! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्रसांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेशचतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचासंकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल !

 

श्री गणेश चतुर्थीला पुजावयाची मूर्ती कशी असावी ? : चिकणमाती किंवा शाडूची माती यांपासून मूर्तीबनवावी, असा शास्त्रविधी आहे. अन्य वस्तूंपासून (उदा. प्लास्टर ऑफ पॅरिस, कागदाचा लगदा) मूर्तीबनवणे, हे धमशास्त्रविरोधी आहे ! मूर्ती आकाराने लहान (एक फूट ते दीड फूट उंच) असावी ! मूर्ती पाटावरबसलेली, शक्यतो डाव्या सोंडेची आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी ! श्री गणेशमूर्ती मूर्तीशास्त्रानुसारबनवलेली असल्यास पूजकाला सामान्य मूर्तींच्या तुलनेत अधिक लाभ होतो. त्यासाठी बाजारातीलआकर्षक मूर्तींच्या मोहात न अडकता अथर्वशीर्षात केलेल्या वर्णनानुसारच गणेशमूर्ती घ्या !

 

शास्त्रानुसार बनवलेली मूर्ती लाभदायी का असते ? : मूर्ती देवतेच्या मूळ रूपाशी जितकी साम्य असणारीअसेल, तितकी ती उपासकाला लाभकारक असते. ऋषीमुनी आणि संत यांनी शास्त्रे लिहिली आहेत. त्यांनादेवतांचा जसा साक्षात्कार झाला, तशी त्यांनी देवतांची वर्णने शास्त्रांत केली आहेत; म्हणून शास्त्रांतसांगितल्याप्रमाणे मूर्ती बनवावी.

 

केळीच्या खोडाचा वापर करा ! : केळीच्या खोडापासून बनवलेले मखर अधिक सात्त्विक असते.

 

 

अनु.क्र.  गणेशोत्सवात हे नसावे !  गणेशोत्सवात हे असावे !
   १. वर्गणी बळाने वसूल करणे ऐच्छिक वर्गणी स्वीकारणे
   २. प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेलीअशास्त्रीय अन् अवाढव्य मूर्ती शाडू वा चिकणमाती यांपासून बनवलेलीअन् नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती
   ३. थर्माकोलची सजावट, भव्य मंडपआणि विद्युत लखलखाट (रोषणाई) नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहानमंडप आणि दिव्यांची आरास
   ४. फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीतेयांमुळे होणारे ध्वनी अन् वायूप्रदूषण तालबद्ध आरत्या आणि भावपूर्णनामजप, तसेच पोवाडे, व्याख्याने आदींचेआयोजन
   ५. विसर्जन मिरवणुकीत गुलाल, हिडीसनाच, स्त्रियांशी असभ्य वर्तन अन्मद्यपान विसर्जन मिरवणुकीत श्री गणपतीचानामजप अन् रात्री १० पूर्वी तिची सांगता

 

 

 

 

गणेशोत्सव आदर्श होण्यासाठी हे करा !

उत्सवस्थळी चित्रपटगीतेरेकॉर्ड डान्सजुगारमद्यपानगुटख्यांची विज्ञापने टाळा !

उत्सवस्थळी स्तोत्रपठणराष्ट्र  धर्म या विषयांवरील व्याख्याने आदी ठेवा !

रांगेतील भक्तांना गप्पागोष्टी टाळून नामजप/स्तोत्रपठण करण्यासाठी उद्युक्त करा !

राष्ट्रप्रेम आणि धर्मनिष्ठा वाढवणार्या विषयांवरील देखाव्यांचे सादरीकरण करा !

 

गणेशोत्सव मंडळांनोलोककल्याणासाठी गणेशोत्सव साजरा करा ! : आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळेआणि सवंग लोकप्रियतेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रतिवर्षी चित्रविचित्र रूपांतील आणि अवाढव्यआकारांतील श्री गणेशमूर्ती बसवतात. श्री गणेशाची मूर्ती धर्मशास्त्रानुसार बनवावी आणि तिची उंची एक तेदीड फूट एवढीच का ठेवावी, असे शास्त्र असले तरी, श्री गणेशाच्या रूपात काही नाविन्य वा आकर्षकतानसेल आणि मूर्ती लहान असेल, तर गणेशोत्सवाला गर्दी कशी होणार ?, असा प्रश्‍न मंडळांच्यापदाधिकार्‍यांना पडू शकतो. यासंदर्भात मंडळांनी काय करायला हवे, हे पुढे दिले आहे.

समाजाला गणेशोत्सवाकडे पहाण्याची आध्यात्मिक दृष्टी देणे : आपण समाजापुढे जे ठेवू, त्यानुसारसमाजाला पहाण्याची सवय लागते. गणेशोत्सव मंडळांनी श्री गणपति अथर्वशीर्षाच्या सामुदायिकपठणासारखे कार्यक्रम आयोजित केले, तरीही लोकांची दाटी होऊ शकते. लोकांची तशी मानसिकता सिद्धकरणे, हे मंडळांचे कर्तव्य आहे. पुणे येथील श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपति संस्थान अथर्वशीर्षाचेसामुदायिक पठण आयोजित करते अन् त्या कार्यक्रमास प्रचंड दाटी होते.

राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वृद्धींगत करणार्या कार्यक्रमांचे आयोजन करणे : सार्वजनिक गणेशोत्सव हाकेवळ सामाजिक सोहळा नसून, हिंदूंची संस्कृती अन् संघटन वर्धिष्णू करण्याची, तसेच हिंदूंना धर्मशिक्षणदेण्याची ती एक पर्वणीच आहे. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम वृद्धींगत करणार्‍याकार्यक्रमांचे आयोजन करावे. याची काही उदाहरणे –

अ. श्री गणेशाची उपासना वाढवणारे धर्मशिक्षण फलक अन् ग्रंथ यांचे प्रदर्शन

आ. संतांनी लिहिलेली भजने, दासबोधाचे निरूपण, राष्ट्रपुरुषांवरील पोवाडे इत्यादी कार्यक्रम

इ. हिंदु धर्मियांवरील अत्याचार, तसेच राष्ट्र अन् धर्म यांची होत असलेली हानी यांच्या विरोधात जागृतीकरणारी भाषणे

ई. स्वसंरक्षण प्रशिक्षण, उदा. कराटे, दंडसाखळी यांचे वर्ग

उ. क्रांतीकारकांच्या जीवनावरील प्रदर्शने

ऊ. सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्तीचा दर्शनसोहळा

या कार्यक्रमांना होणारी दाटी खर्‍याखुर्‍या राष्ट्रप्रेमी किंवा धर्मप्रेमी लोकांची असेल आणि अशा लोकांच्याप्रयत्नांतूनच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचे सुराज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन होईल.

गणेशोत्सव मंडळांनो, असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीतुम्हाला साहाय्य करतील. देवतेला चित्रविचित्र रूपांत दाखवून देवतेची अवकृपा ओढवून घेऊ नका ! सध्याश्री गणपतीच