प.वि.पाटील विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा-विद्यार्थ्यांनी भरवली शाळा

0
1206
Google search engine
Google search engine

जळगाव :/

के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय एम.जे.कॉलेज जळगाव येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.इयत्ता 4थी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत विविध वर्गात अध्यापन केले.

मुख्या.म्हणून असलेली विद्यार्थिनी कु.प्राजक्ता कोल्हे व शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पालक शिक्षक संघामार्फत सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे.गुरुविना विद्या नाही.आपला पहिला गुरू म्हणजे आपली आई वडील त्यांनतर आपले शिक्षक व समाजातुन ज्या ज्या घटकांपासून आपण शिकतो ते सर्व गुरू आपल्या जीवनात मोलाची भूमिका बजावतात म्हणून आपण नेहमी त्यांच्या ऋणात राहावे अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे महत्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रणिती पाटील ,कु. साक्षी इंगळे , कु.आदिती सावंदे यांनी केले तर आभार कु.रितीशा देवरे यांनी मानले .यशस्वीतेसाठी उपशिक्षिका कल्पना तायडे , सरला पाटील ,दिपाली पाटील , योगेश भालेराव , आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.