उस्मानाबाद चे प्रा राजा जगताप यांचा विशेष लेख

0
1088
Google search engine
Google search engine

—————————————
आज ५सप्टेंबर .शिक्षक दिन ..!
माजी राष्टपती राधाकृष्णन यांचा जन्म दिवस …एक शिक्षक ,पिढी घडवतांनाच मोठ्या पदाला पोहचतो आणि शिक्षकांची ओळख विश्वाला दाखवतो. आजच्या दिवशी शिक्षकांनी आत्मपरीक्षण केले आणि विद्यार्थ्यांच्यात सृजनशीलता निर्माण करूण संस्कारातून मानवी मुल्ये रूजवली तर ..एक बलशाली भारत होईल.माझा देश हिच, माझी ओळख होईल . “शिक्षकांचा आज गौरव “व्हावा .
पण …शिक्षक,पालक,समाज,सरकार यांनी अंर्तरमुख व्हावे व मंथन करावे —शिक्षक दिना निमित्त घेतलेला धांडोळा …
प्रा.राजा जगताप यांचा लेख
—————————————

*शिक्षक दिन साजरा करतांना*
——————————————

५सप्टेंबर शिक्षक दिन …अनेक शिक्षकांना .चांगले काम करणा—यांना .”आदर्श शिक्षक” पुरस्काराणे सन्मानित केलं जातं .त्यांचा गौरव केला जातो आणि करावाही .यामध्ये दुमत आसण्याचे कोणतेही कारण नाही .
आज समाज बदलतोय, माणसं बदलताहेत,भवताल व एकुणच पर्यावरण बदललं जातय आणि याचाच भाग म्हणून की काय … सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक जीवन बदलतय .स्पर्धा वाढलिय आणि म्हणूनच गुनवत्तावान पिढी घडवली जातेय .प्रत्येकाला वाटतं …माझा मुलगा एक नंबरणेच यावा .यातूनच कोवळी ,खेळकर मुलं मुक्त बालपण हरवून बसायला लागलित .खेळणं बंद झालं ,मुलांचा मातिचा संबंध संपला . शेणा मातीच्या निर्मळ घरांचा जमाना गेला आणि स्टाईलचा जमाना आला .मुलांच्या हाडाला कॅलशियम कमी पडालं .डाॅक्टरच सांगु लागले. इंग्रजी शाळांचं पेव फुटलं .”इंग्रजी शाळा जोमात मराठी शाळात कोमात.”मग सरकारची धोरणंं .पटसंख्या कमी आसणा—या शाळा बंद .जर गाव खेड्यातल्या ,आदिवासी पाड्यातल्या ,डोंगर कपा—यातल्या शाळा बंद पडल्या तर …
आज या बदलत्या काळात नव .नव्या बदलांणे अनेक प्रश्न निर्माण केलेत .वाढती बेकारी,वाढता भ्रष्टाचार गाव खेड्यातलं , झपाट्याणे पोहचलेलं राजकारण .जि.प.शाळेतील शिक्षकावर वाढणारा तणाव , दबाव.शिक्षकांनी शाळेत छडीचा वापर करायचा नाय .या प्रश्नांनी अनेक शिक्षकांपुढे प्रश्न निर्माण केलेत .नेमकं काय करावं …!हे शिक्षकांना कळेणासे झाले.
तरीही ,शाळेची घंटा वाजतेच आहे .मुलांची शाळा भरतेच आहे .ज्ञानदानाचं पविञ काम केलच जात आहे .
आजचा दिवस …”शिक्षकांच्या गौरवाचा “दिवस .ज्यांनी आपल्या सृजनशीलतेतून विद्यार्थ्यांना नाविन्यातून जे दिलं ,भिंतीवरील चिञ पोरांच्या काळजात ज्यांनी उतरवली .शिकवण्याची पारंपरिक पध्दत बदलून …हसत ,खेळत,चालिवरच्या कविता विद्यार्थ्यांच्या गळी उतरवल्या .हे करतानांच मतदार याद्यांच काम करणा—या ,शालाबाह्य मुलांना शाळेत आणना—या व स्काॅलरशीपच्या ज्यांच्या विद्यिर्थ्यांनी बाजी मारली त्यांचा व ज्या शाळेत जायला रस्ता नाही त्या पाऊलवाटेणे ३६५ दिवस पायी चालणा—या शिक्षकांचा आजचा दिवस. म्हणूनच एका दोह्यात संत कबिर शिक्षकाला “रत्नाची खान” म्हणतात .साने गुरूजींची परंपरा आजही जोपासणारे कांही शिक्षक आहेतच .रविंद्रनाथ टागोर ,कर्मविर आण्णा ,डाॅ.बापूजी साळुंखे ,यांनी क्षिक्षकावर खूप विश्वास टाकला .पिढी घडवण्याचे सामर्थ्य शिक्षकातच असते सांगितलं .विद्यशिवाय प्रगती नाही म.फुले यांनी सांगितलं .”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो घेईल तो गुरगुरल्याशीवाय शांत बसणार नाही” हे बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षणामुळे आणि चांगल्या शिक्षकामुळे समाज घडू लागला .वाढू लागला .पूर्वी शिक्षकाला खूप किंमत होती .
मान होता ,सन्मान होता ,त्यांचेबद्दल जिव्हाळा होता .
आज हे चिञ बदलत जाऊ लागलं .पगारूपनातून या घटकाकडे पाहू लागलं .संशयाने लोक पाहू लागले शोशल मिडीयात शिक्षक विनोदाचा घटक झाला . विनोदातून शिक्षकाला बदनाम केलं जाऊ लागलं .हे वास्तव नाकारता येत नाही .
आज या स्पर्धेच्या युगात …माणूस घड्याळ्याच्या काट्याणेच पळू लागला .फक्त पैसा ! येवढच त्याचं विश्व झालं .नातेवाईकच काय स्वताचे आई,वडील ,नाती त्याला नकोशी झाली.शहरातली “वृध्दाश्रमातली” गर्दी हेच सुचवतेय .आज मानवी मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत ,जातीपातीचा नायनाट होण्याऐवजी बळकट होतांना दिसताहेत. लोकशाहिच्या नावाखाली झुंडशाही बळावत आहे .समाजात गरिब स्ञीयावर ,माणसावर अन्याय वाढताहेत .तरूण पिढी दिवसेंदिवस दिशाहिन बनत चाललिय …निराशा वाढतेय .
शिक्षणाचा वास्तवाशी मेळ घालता येईना .अभ्यासक्रम कुजकामी ठरायला .त्यामुळे वास्तवात कसं जगायच?नोकरी नाही मिळाल्यावर कसं जगायचं?
निराशा कशी झटकायची ?गुनवत्ता नाही मिळाली तरी मात कशी करायची?मायबापाचा सांभाळ कसा करायचा ? माझ्या जाती धर्मापेक्षा माझा देश कसा मोठा आहे .”सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही प्रतिज्ञा वास्तवात वाड्या ,वस्तीवर ,गावागावात वास्तवात कशी आणायची मानवी मुल्ये कशी रूजवायची? असंख्य प्रश्न आहेत .

या वरील प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर आजचा शिक्षकच करू शकतो मग तो , प्राथमिक ,माध्यामिक ,कनिष्ठ,वरिष्ठ कुठला का असेना ,जागरूक तेवढाच प्रामाणिक आसणे आवश्यक आहे .शिक्षकांनी मन लावून जर या मुलात,तरूण विद्यार्थ्यांच्यात जीव ओतला तर हिच भावी पिढी सक्षम होईल .शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे .तशीच, आजच्या शिक्षक दिनी ,पालकांनीही मंथन करणे गरजेचे आहे .केवळ शिक्षकाला दोष देण्या ऐवजी आपल्या पाल्यांचे वर्तन सुधारल्यास त्याच्यावर दबाव राहातो आहे .
आजही विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी आपलीच समजून अनेक शिक्षक धडपडतात मुळात त्यांची धडपड कोणत्या पुरस्कारासाठी नसतेच .या पुरस्कारावरही कांही संशय घेतात .तो किती खरा किती खोटा या भानगडीत पडण्याऐवजी आपण पिढी घडवण्याचे काम अविरतपणे करत राहाणे याचिच गरज आहे .
प्रत्येक शिक्षकांने आपला विद्यार्थी म्हणजे आपले दैवत समजून जर ज्ञानदानाचे पविञ काम केले तर सक्षम पिढी घडायला वेळ लागणार नाही .आज मुलांवर चांगले संस्कार, शाळा ,महाविद्यालयातूनच केले जातात . म्हणूनच समाजात नैतिकता टिकून आहे .समाजाच्या वातावरणात ,समतोल आहे .शिक्षकच पुस्तके वाचून स्वताचे मस्तक सक्षम करतो आणि त्या ज्ञामाच्या बळावरच विद्यार्थ्यांची मस्तके घडवतो .त्यांच्या वैचारिक कक्षा रूंदावतो त्यांना जीवनात यशश्वी होण्यासाठी ,गरूड भरारी घेण्याचे बळ देतो.वर्गात तो नाविन्यपुर्ण कल्पना मांडतो,उपक्रम राबवतो .त्यातूनच विद्यार्थ्यांच्यात गोडी निर्माण करतो .आणि विद्यार्थी रमतो .खरं तर विद्यार्थ्याला रमवणे हे काम सोपे नाहिच .
आज शिक्षक दिन साजरा करतांना …कांही यशस्वी झालेले माजी विद्यार्थी शक्ये झाल्यास शिक्षकांना भेटून त्यांचा गौरव करतात .कोणी पञातून,मेसेजमधून ,कोणी पुरस्कार देवून,कोणी शिक्षकावर चार शब्द बोलून ,सरकार पुरस्कार देवून ,शाळा ,महाविद्यालयात गुलाब फुले .गुच्छ देऊन.समाजात आजच्पा दिवशी शिक्षकाबद्दल चांगलं बोललं जातं .शिक्षकांचं कौतूक होतांना सगळ्यांनाच बरं वाटतं. चांगला शिक्षक आयुष्यभर विद्यार्थीच असतो. पण कांही पोटभरू ,ऊद्योगशील शिक्षक काॅपीला संरक्षण देतात ,व्यसनाधिनता करतात आणि यांचे मुळे सर्व शिक्षक बदनाम होतात .शिक्षकाकडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टीकोण बदलतो. ख—या शिक्षकाला “गव्हा बरोबर कीडे रगडतांना वाईट वाटतच “.पण कांही शिक्षकांमुळे हे आरिष्ठ ओढवतं .पण अनेक शिक्षकांच्या चांगल्या कामाणे शिक्षण क्षेञ ऊजाळते हे माञ सत्य आहे .
एक चांगला समाजशील ,विद्यार्थीप्रिय ,समाज घडवणारा शिक्षक व्हावयाचे असेल तर मुलांना मुक्तपणांचं शिक्षण द्दा .निसर्गाची कविता शिकवायची असेल तर गावच्या हिरवळिवर चालत जा ,शहरा लगतच्या डोंगरावरच्या हिरवळित जा .सहलही घडेल .आणि त्यांना कविताही कळेल आणि शिक्षणाची गोडी वाढेल .
यासाठी शिक्षकाकडे तळमळ हवी ,जिद्द हवी,मेहनत हवी .ज्यापध्दतीने “शिक्षक “होतांना जे ट्रेनिंग घेता त्या पध्दतीने जर तुम्ही गेलात तर तुमचा विद्यार्थी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही .
फुले दापत्याणे मेहनतीणे शिक्षणाची दारे सर्वांना खुली केली ,समाज घडवला. त्याचपध्दतीची तळमळ आजच्या शिक्षकाकडे आसलिच पाहिजे .आज आपल्या शिक्षकाकडे तंञज्ञान उपलबद्ध झाले आहे त्याचा चांगल्यासाठी वापर करा .

आज शिक्षक म्हणून जे आपणास भरपूर मिळतय त्यात समाधान मानल्यास …गरजा मर्यादित ठेवल्यास आपण प्रसन्न मनाने पारिजातकासारख्या फुलासारखी ज्ञानांची फुले ,ऊधळल्यास .त्याचा सुगंध ,शाळातल्या विटात ,रंगात मिसळेल आणि शाळेच्या रंगीत भिंतीसुध्दा सुगंधित होतील …आणि आपल्या पविञ हातातून कळ्या नक्किच सुगंधित खुलतिल यात वाद नाही .
कारणा लाडक्या शिक्षकाची बदली झाल्यावर त्या शिक्षकांच्यासाठी अनेक रडणारी कोवळी पोरं,पोरी आपल्याच परिसरात रडतांना चॅनलवर पाहिली.अनेक पेपरातून फोटो पाहिले .त्या शिक्षकांला अनेकांनी सलामच केला .जर असे शिक्षक गाव शहरातल्या प्रत्येक शाळेला मिळाले तर हे शिक्षण क्षेञ केवढ्या गतीने पविञ होईल यात शंका नाही .
आजचा “शिक्षक दिन साजरा करतांना …!”आणखी एक शिक्षकांनी ठरवावे आपला उस्मामाबाद जिल्हा सततच्या दुष्काळाणे खचलाय …कसलही येथे औद्योगिकरनाचं लोन नाही .पर्यायाने रोजगारांच्या संधी नाहित .म्हणावं तेवढं बागायतीदार क्षेञ नाही .शेतमजूरांची संख्या जास्त .कोरडवाहू शतक—यांची संख्या जास्त .पिण्याच्या पाण्याची बोंब “निसर्गानं नेहमीच हुलकावलं ,सरकारनं झुजवलं …मागून लातूर पुढं गेलं आम्ही आहो तेथेच राहिलो ….!”
याची जाणीव ठेवावी .कारण या जिल्ह्यालाला शिक्षण व गुनवत्तेशिवाय पर्याय नाही .नोकरी ,रोजगारा शीवाय येथला माणूस ऊभे राहुच शकत नाही या भावनेतून शिक्षकांनी मेहनत घेतली तर या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहाणार नाहि .
अभ्यासक्रमातून गुनवत्ता वाढवतांनाच…अंधंश्रध्देला दूर करण्याचे धडे द्या .त्याला वैज्ञानिक दृष्ट्या सक्षम बनवा ,शारिरीक दृष्ट्याही सक्षम बनवायचे धडे द्या .न खचण्याचे पाडे ही त्याला द्या .संकटावर मात करण्याचे धडेही द्या .बलशाली भारताचा सक्षम तरूण तुमच्याकडूनच तयार होईल .
असंख्य विद्यार्थ्यांना घडवणा—या तमाम चांगल्या शिक्षक बांधवांना आज शिक्षक दिनी मनापासून शुभेच्छा …!

——————————————
प्रा.राजा जगताप
आर.पी.काॅलेज ,उस्मानाबाद.
मो नं ९८८११८८२६३
—————————————