चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती 10 रुपयांत फिटनेस सर्टिफिकेट, बाजार समिती प्रशासन चे दुर्लक्ष

0
1300
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती 10 रुपयांत फिटनेस सर्टिफिकेट, बाजार समिती प्रशासन चे दुर्लक्ष,
अवैध जनावर तस्करी त्या घटनेची होऊ शकते पुनरावृत्ती, राजमुद्रा अंकित प्रमाणपत्राचे अहवालना;विभागीय आयुक्तांकडे तक्रार;
चांदूर बाजार:- बादल डकरे
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरणाऱ्या गुरांच्याबाजारात पशुधन विकास अधिकाऱ्यांतर्फे कोणतीही पाहणी न करता आणि आपली खुर्ची न सोडता बसल्या ठिकाणी राजमुद्रा अंकित असलेले शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येते. यामुळे जनावर खरेदी विक्री करताना याचा गैरवापर केला जात आहे. हा गैरप्रकार राजमुद्रा अंकित प्रमाणपत्रा ची अहवालना करणारा प्रकार आहे. यामुळे या प्रकरणातील दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी याकरिता विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.
गेल्या चार महिन्यापूर्वी बाजार समितीत अवैध जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहारात अफरातफर प्रकरणी बाजार समिती सचिव सह सर्व 20 संचालकांना अटक करण्यात आली होती. या घटने मुळे राज्य भरात चर्चेत असलेली स्थानिक चांदुर बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती ने कोणताच धडा घेतला नाही. तर काही दिवस या बैलबाजारात उपाययोजना केल्याचा बनाव अवघ्या 3 महिन्यातच उघड पडला आहे.
बाजार समितीत रविवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजारात परतवाडा येथून येणारे पशुधन विकास अधिकारी कोणतीच पाहणी न करता देत शासनमान्य प्रमाणपत्र देत असल्याची माहिती शेतकरी सुरेश वानखडे यांना मिळाली होती . त्यानुसार त्यांनी बाजार समितीतील गुरांच्या बाजारात कोणतेही जनावर न नेता पशुधन विकास अधिकारी सतीश वीधळे व सहाय्यक पशुधन विकास अधिकारी फुने यांच्याकडून दहा रुपये भरून जनावरांचा फिटनेस प्रमाणपत्र मिळवला. या प्रकरणाची बाजार समितीत बोगस रित्या फिटनेस प्रमाणपत्र दिल्या जात असल्याची सांगितले ला दिली.त्यामुळे अपना काम जमता अशी भूमिका त्या पशुधन अधिकारी यांनी घेतली असल्याचे दिसत आहे.
बाजार समिती मध्ये देन्यात येणारे फिटनेस प्रमाणपत्र राजमुद्रा अंकित महाराष्ट्र शासन मान्य असल्याने परतवाडा येथील चेकपोस्ट चे प्रथमश्रेणी पशुधन विकास अधिकारी यांच्या स्वाक्षरी ने देण्यात येते. मात्र अवघ्या 10 रुपया साठी शासकीय अधिकारी ने बोगसरीत्या प्रमाणपत्र देने राजमुद्रा अंकित प्रमाणपत्र ची अहवाल ना नाही काय ? असा प्रश्न या वेळी उपस्थित होते आहे. या प्रकरणाची तक्रार सुरेश वानखडे यांनी वि विभागीय आयुक्त अमरावती यांचा कडे केली आहे. त्या मुळे याप्रकरणी दोषींवर काय कार्यवाही होते या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या सर्व प्रकारामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी त्या प्रकरणात काहीच स्मरणात नसल्याचे दिसत आहे.मागे पाठ आणि पुढे सपाट अशा स्थानिक बाजार समिती चा दिसून येते आहे तर या सर्व प्रकरणामुळे बाजार समिती सचिव सदस्य याना पुन्हा मागील प्रकरणास उजेला देत असल्याचे दिसत आहे तर या वर लवकरात लवकर लगाम लावली नाही तर बाजार समिती प्रशासन पुन्हा अडचणीत येऊ शकते.