आमदार राम कदम यांच्या फोटोला साड्या/बांगड्या /चप्पलांचा हार -सक्षणा सलगर

0
934

उस्मानाबाद -राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वात भाजपाचे आमदार राम कदम यांचा साडी, बांगड्या व चपलांचा हार घालून केला निषेध..

भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी मुलीची परवानगी नसेल तरीही तिला पळवून नेण्याचे आक्षेपार्ह विधान दहिहंडीच्या उत्सवात केले. हे अत्यंत निषेधार्ह विधान असून जमावा पुढे असे वक्तव्य करणे चुकीचे आणि संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी क्रांति चौक औरंगाबाद येथे दिली पुढे बोलताना त्या म्हंणाल्या एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी “”बेटी बचाव बेटी पढाओ”” अशी घोषणा करत आहेत तर दुसरीकडे राम कदम त्यांच्या विपरीत जाऊन बेटी भागाओचा कार्यक्रम राबवत आहेत राम कदम नेहमी आपण किर्तनकार असल्याचा टेंभा मिरवत फिरत असतात, आपण किती सज्जन आहोत हे दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांच्या कालच्या वक्तव्यातून स्पष्ट होते की ते किती सज्जन पुरूष आहेत, असा टोला त्यांनी लगावला. राम कदम मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहे. वेळोवेळी ते पक्षाची भूमिका मांडत असतात. भूमिका मांडणाऱ्यांची विचारधारा अशी आहे तर पक्षाची विचारधारा काय हे यातून स्पष्ट होते.”
औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने ही यावेळी निषेध व्यक्त केला “राम कदमच करायच काय खाली मुंडकं वर पाय” महिलांचा अवमान करणाऱ्या रावण कदमचा धिक्कार असो,भाजप सराकारचा धिक्कार असो’
“राम कदम मुर्दाबाद” अशा घोषणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौक,परीसर दणाणून सोडला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या युवती, महिला, आणि ईतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.