👉🏻सोयाबीन उत्पादन शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात, 👉🏻तर कृषी सेवक कडून याच्या माहिती चा अभाव,कृषी सेवक प्रति तालुक्यात रोष व्यक्त

0
1230
Google search engine
Google search engine

👉🏻सोयाबीन उत्पादन शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात,
👉🏻तर कृषी सेवक याच्या माहिती चा अभाव,कृषी सेवक प्रति तालुक्यात रोष व्यक्त

चांदूर बाजार:- प्रतिनिधी

👉🏻चांदुर बाजार तालुक्यात सोयाबीन पिकावर खोड किड्याचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यामुळे तसेच सोयाबीन पिवड़े पढून सोयाबिंचे पाने जळले जात असल्या कारणाने त्या पासून आता कोणतेही उत्पन्न मिळणार नसल्याचे शेतकार्याच्या लक्षात येताच आपल्या शेतातील सोयाबीन च्या प्लाट मध्ये रोटारेटर फिरविले आहे जात असल्याचे चित्र, काजळी,कोदोरी,गणोजा,सुरुळी,सोनोरी भागात पाहायला मिळत आहे.
तालुक्यातील काजळी, गणोजा,सोनोरी,ब्राम्हणवाडा गावातील शेतकरी वर्ग यांनी आपल्या शेतात रोटरेटर मारले. त्यात पावसाने मधात दांडी मारली.त्या नतर पाऊस आला तर अतिवृष्टी घेऊन आला.त्यानंतर आलेल्या पावासामुळे शेतकरी वर्ग मध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र काही दिवसाच सोयाबीन पिवड़े पडून पाने झाळू लागली.पूर्ण शेतातील सोयाबीन पिवड़े पडून पूर्णतः पाने झारली त्यामुळे लावालेला खर्च ही निघत ,नसल्याचे पाहुन शेतकर्याने आपल्या शेतात अखेर रोटारेटर फिरविले.
हीच परिस्थिती अनेक शेतकरी वर्ग वर दिसून येते आहे. शेतकरी सोयाबीन पिकावर रोटारेटर फिरविन्याच्या तयारित आहे.
तशेच तालुक्यातिल कापूस पिकावर सुद्या बोंड अड़ी च्या प्रादुर्भाव झाला आहे. त्या मुळे कापूस पिक सुद्या शेतकऱ्या च्या हातून गेले असल्याचे दिसत आहे.

” शेतकरी यांना वेळोवेळी कृषी विभागाने शेतकरी यांच्या बाधावर सल्ला देन्यासारख्या विविध योजना शासनाच्या सुरु केल्या आहे.मात्र कृषी विभाग शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ला देण्यास कृषी विभाग अपुरा पड़त असल्याचे शेतकरी वर्ग मध्ये बोलले जात आहे. शेतकार्याना पूर्वी शेतकरी यांच्या शेताकडे फिरकत सुद्या नाही मग शेतकरी यांची आरडाओरड झाली की कृषी विभागाला जाग येतो .शेतकरी यांच्या सहकार्य करिता कृषी विभागामध्ये कृषी सेवक पद आहे.या कृषी साय्यकाना आपल्या मुख्यालयी राऊन शेतकरी सोबत चर्चा करुण त्याना आलेल्या समस्याची वेळोवेळी निराकरण करने जरुरीचे असते.किवा त्यांना त्या बदल माहिती नसल्यास आपल्या वरिष्ट ना माहिती देऊन ति समस्या सोडविने आवश्यक असते.मात्र हे कृषी सेवक फील्ड वर कमी व कार्यालयात जास्त दिसत असल्याचे शेतकरी मध्ये चर्चा मधून व्यक्त होत आहे.त्यामुळे वेळेत शेतकरी याना मार्गदर्शन नसल्यामुळे अशि परिस्तिति शेतकरी वर ओडविली जात असल्याचेही बोलले जात आहे.तर काही कृषी सेवक हे थोड्याच शेतकरी यांच्या वर्ग मध्ये लाभ आणि माहिती देत असतात.त्यामुळे त्यांना इतर शेतकरी दिसत नाही.तर काही शेतकरी यान कृषी सेवक पद सुद्धा आहे आणि हे कृषी सेवक शेतकरी याना माहिती देण्यासाठी आहे हे पण माहिती नाही त्यामुळे कृषी सेवक प्रति रोष तालुक्यात निर्माण होते आहे.”