कसबे तडवळ्यात शिक्षक दिन उत्साहात साजरा

551

उस्मानाबाद -(कसबे तडवळे /प्रतिनिधी) उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, जयहिंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, या तिन्ही शाळेमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला असून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक आदर्श शाळेच्या शिक्षकां‌न‍ा गुणवंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले

यामध्ये जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीतर्फे शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांना गौरवण्यात आले. यामध्ये श्रीमती पठाण एस एम, श्रीमती ओव्हाळ व्ही जी, प्रदिप म्हेञे, रहेमान सय्यद , बाळासाहेब जमाले या शिक्षकांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, पुस्तक, व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील, सरपंच मन्मथ आवटे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कदम,भाऊ सुरवसे, शिक्षण समितीचे धनाजी गडकर , वंदू भालेराव, बालाजी जाधव, बाळासाहेब थोडसरे, किरण होगले , पत्रकार विकास उबाळे, अरुण निकम व आदि उपस्थित होते

जिल्हा परिषद आदर्श कन्या शाळेतील सर्व शिक्षकांचा यथोचित सन्मान करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळाव्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार भागवत शिंदे , प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्या सौ .सारिकाताई शहाजी वाघ , पंचायत समिती सदस्य सुधीर करंजकर हे होते , कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सन्मानाचा फेटा, पुष्पगुच्छ व अब्दुल कलामांचे पुस्तक भेट देऊन अनोखा सन्मान करण्यात आला , प्रताप करंजकर यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक धायगुडे जे. एल यांनी केले आभार मुख्याध्यापक वाघमारे बाळासाहेब यांनी मानले. सूत्रसंचालन ढवळे सर यांनी केले. व्यासपीठावर विकास उबाळे,अरुण निकम ,रोफ कोरबू, तुकाराम शिंदे ,निळकंठ पवार, यांच्यासहगावातील प्रतिष्ठित व शिक्षण प्रेमी नागरिक आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.

जयहिंद विद्यालयात ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल , फेटा व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी गावचे सरपंच मन्मथ आवटे ,एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील वळेकर, किशोर डाळे , अमर शेख, भाऊ सुरवसे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।