कावड उत्सवाच्या बंदोबस्तात एन सी सी कॅडेटचा सहभाग ;ठाणेदार शेळकेंचे चोख नियोजन

0
736
Google search engine
Google search engine

आकोट- अकोट शहरात पार पडलेल्या भव्य कावड उत्सवात अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, व उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनात योग्य नियोजन करत नवीन प्रयोग राबविले, ह्या वर्षी अकोला व अकोट येथे एकाच वेळी कावड उत्सव असल्याने गांधी ग्राम, अकोला व अकोट येथे एकाच वेळी बंदोबस्त लावावा लागला त्या मुळे ह्या वर्षी अकोट शहराला अत्याल्प बंदोबस्त प्राप्त झाला , अकोट शहराची संवेदनशीलता व कावड मिरवणुकीचा लांब मार्ग पाहता बंदोबस्ताचे व्यवस्थित नियोजन करून बंदोबस्त करणे गरजेचे होते त्या साठी पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी ह्या वर्षी प्रथमच शिवाजी चौक ते अकोला नाका हा रस्ता चारचाकी वाहना साठी सकाळी 8।30 ते 1 वाजे पर्यंत बंद ठेवण्यात आला, त्या साठी अकोट बसडेपो व्यवस्थापक ह्यांचे सोबत चर्चा करून बसफेऱ्या चे नियोजन करण्यात आले, देवरी फाट्यावरच जड वाहतूक थांबवून ठेवण्यात आली, ह्या बाबत प्रसिद्धी माध्यमांकडून अगोदरच प्रसिद्धी देण्यात आली होती,ह्या नियोजना मुळे, नेहमी कावड मीरवणूक व रहदारी मुळे ठप्प झालेल्या रस्त्या मुळे शिवभक्तांना शिवाजी चौकात लेझीम व इतर वेगवेगळ्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करता येत नव्हते, परंतु ह्या वर्षी रहदारीच्या उत्तम नियोजना मुळे, सर्व कावड मंडळाला आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाल्या मुळे शिवभक्त खुश दिसत होते, ह्या वर्षी प्रथमच कावड मिरवणुकीचे झोन पाडून त्या प्रमाणे बंदोबस्त लावण्यात आल्याने शेवटच्या कावड पर्यंत बंदोबस्त दिसून आला, तसेच शेवटच्या टप्प्यात सराफा लाईन नंतर वाद्यांची वाहने तापेश्वरी मंदिराकडे न जाऊ देता सरळ सोनू चौकाकडे पाठविल्याने, जास्त कावड आत मध्ये जाऊ शकल्याने वेळ वाचला, तसेच ह्या वर्षी पहिल्यांदाच कावड उत्सवात शिवाजी महाविद्यालयाच्या 40 एन सी सी कडेट बंदोबस्तात सामील करून घेण्यात आले होते,ह्यासाठी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंबादास कुलट व प्राध्यापक प्रशांत कोठे ह्यांचे सहकार्य मिळाले ह्या सर्व नियोजना मुळे कावड मिरवणूक 1 तास उशिरा सुरू होऊनही व ह्या वर्षी प्रत्येक पक्ष व संघटने कडून शिवभक्तांची स्वागत व फराळाची वयवस्था मागील वर्षी पेक्षा जास्त असल्याने त्यात वेळ जाऊनही कावड मिरवणूक लवकर संपली, कोठेही पोलिस व शिवभक्ता मध्ये बाचा बाची किंवा संघर्ष दिसून आला नाही, अतिशय खेळी मेळी च्या वातावरणात कावड उत्सव पार पडला. ह्या साठी सर्व शिवभक्तांची पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आभार मानले.तर शिवभक्तांनी पन ठाणेदार शेळके व पोलीसांनबाबत आभार व्यक्त केलेत.