SFI चे मुखेडमध्ये (जि.नांदेड) पंचायत समिती कार्यालयात घेराव आंदोलन.

0
848
Google search engine
Google search engine

“शिक्षण आमच्या हक्काचं , नाही कुणाच्या बापच”– SFI

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

मुखेड येथील जिल्हा परिषद हायस्कुल (मुलींचे) या शाळेत विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे शिक्षक नियुक्ती करण्यात यावी. मुलींच्या शासकीय वसतिगृह परिसरातील अतिक्रमणे काढावीत. शाळेला कंपाऊंड वॉल बांधण्यात यावी. अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( SFI) ने घेराव आंदोलन केले.
या घेराव आंदोलनास जिल्हा परिषद हायस्कूल मधील रोजच्या सर्व प्रकारच्या अडचणींना कंटाळून एकजुटीने – एकनिश्चयाने आपल्या हक्कासाठी आपल्याला न्याय मिळावा यासाठी आवाज उठवत पंचायत समिती कार्यालय मुखेड (जि. नांदेड) हादरवून सोडले.

एस.एफ.आय च्या कार्यकर्त्यांनी व सर्व विद्यार्थिनींनी आपला हाक्क आपल्याला मिळालाच पाहिजे अश्या वेगवेगळ्या घोषणांनी पंचायत समिती व मुखेड
परिसर एस.एफ.आय मय झाला होता.

या घेराव आंदोलनाचे नेतृत्व SFI नांदेड जिल्हा उपाध्यक्ष विजय लोहबंदे व SFI मुखेड तालुका कमिटी यांनी केले.

या घेराव आंदोलनात आपल्या अधिकारासाठी आपल्या बघिणींच्या व स्वतःच्या  हक्का साठी सहभागी झालेल्या सर्व शालेय मुलींचे व SFI मुखेड तालुका कमिटीचे अभिनंदन एस. एफ. आय. नांदेड जिल्हा कमिटीने केले.