अग्रसेन चौक लक्कडगंज येथे शशांक कासवे मित्र मंडळाच्या दहीहांडीचा जल्लोष.

0
1051
Google search engine
Google search engine

आकोट(संतोष विणके )- स्थानिक अग्रसेन चौकात शशांक कासवे मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहांडीचे आयोजन करण्यात आले होते.;२१०० रु.बक्षिसासह ५०० रु.चे विशेष बक्षिस यावेळी ठेवण्यात आले होते.पाण्याचा शिडकाव,आनंद उत्साहाची झिंग.अन हजारोंचा जनसमुदायात यावेळी गित संगीताच्या तालावर विविध आखाड्यांनी येथील हंडी फोडण्यासाठी गर्दी केली होती.येथील दहीहंडीच्या विशेष आयोजनासाठी शशांक कासवे. सिटी चँनलचे ललीत व्यास , मंगेश सावरकर, वैभव गिरी, आकाश वसु ,अशोक खापरकर , अक्षय घायल, अक्षय गावंडे ,नरेश सभागचंदानि ,अनोख गहले पुष्पक चेडे यांच्यासह समस्त लक्कडगंज येथील व्यापारी तथा नागरीकांनी आपले सहकार्ह दिले.दरम्यान येथील दहीहांडीचा आनंद लुटण्यासाठी आबाल वृद्धांनसह नागरीकांची गर्दी आकर्षण ठरली होती.