कचऱ्यामुळे मोंढा परीसरात दुर्गंधी दुकानदार व नागरिकांच्या आरोग्यास धोका

0
745
Google search engine
Google search engine

औरंगाबाद ( केतन कोलते)

शहरी व ग्रामीण भागातील लोक आपला माल भरण्यास मोंढ्यात येत असतात. रस्त्यावर पडलेला कचऱ्याचे ढिगारे बघुन येनारे – जानाऱ्यांना आपले रूमाल नाकाला लावण्याची वेळ आली आहे. परिसरात मोठया प्रमाणात कचऱ्याचा ढिग आठड्या भरापासून तशाच अवस्थेत पडलेला आहे. हवेमुळे कचरा सर्वत्र रस्त्यावर पसरला असून, या करऱ्यावर गाई , बैल, शेळ्या ताव मारतांना दिसून येत आहे.
परिसरातील राहणारे नागरीक व दुकानदार येथे कचरा आणून टाकतात. यामुळे
दिवसेंदिवस तसाच कचऱ्याचा ढिग पडून असतो. आठवड्या भरापासून म.न.पा.चे कचऱ्याचे वाहन न आल्याने लोकांना दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरीकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोंढ्यात मोकाट जनावरांचे मोठ्या प्रमाणात वावट असते.यात शेळ्या, गाई-बैल इत्यादी जनावरे खाण्याच्या शोधात फिरत असतात. खाण्यासाठी काही न मिळल्यावर हे जनावरे आपले खाद्य समजून कागद,प्लास्टिक, चपला इ. मिळेल त्या वस्तू खाउन टाकता. यामुळे याचा गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यवर होतो. लवकरात लवकर या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकानी दिल्या.