महेंद्र धुरगूडे यांनी केला शिक्षकांचा सत्कार

0
764

लतीफ मामा शेख ,नळदुर्ग———————————उस्मानाबाद – तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या वतीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून शिक्षकांचे सत्कारलतीफ मामा शेख नळदुर्ग :- तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या संकल्पनेतून शिक्षकदिनाचे औचित्य साधुन मंगरुळ जिल्हा परिषद प्रशालेत त्यांना इयत्ता पहिली ते दहावी ज्या शिक्षकांनी शिकवले आशा शिक्षक गुरूजनांचा महेंद्र धुरगुडे यांनी शिक्षकदिनाचे औचित्य साधून फेटा , शाल , पुष्पहार , वही , पेन आणि शिवाजी महाराज यांच्या माहितीचे पुस्तक देऊन सत्कार केला.या सत्कार समारंभात मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षकांनी महेंद्र धुरगुडे यांचे कौतुक करुन म्हणाले की आज आम्ही सर्वजण जवळपास 30 वर्षानंतर भेटुन एकत्र आलो आहोत हा योगायोग केवढ महेंद्र काका धुरगुडे यांनी साकारलेल्या संकल्पनेतून या शिक्षक दिनाच्या निमित्ताने घडुन आला.शिक्षण झाल्यानंतर शिष्य आपल्या गुरुजनांना गुरुदक्षणा देत असतो. आज महेंद्र धुरगुडे यांनी गुरुदक्षणा देऊन खऱ्या अर्थाने शिक्षक दिनाच्या आम्हा सर्व शिक्षक बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या हे विशेष असल्याची भावना व्यक्त केली..या कार्यक्रमात बोलताना जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षकांचा गौरव केला.सत्कार समारंभ पार पडल्यानंतर धुरगुडे परिवाराच्यावतीने सर्व गुरुवर्य शिक्षक बांधवांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळीबाबुराव दिलपाक,अशोक जोशी, गोपाळ चव्हाण, उद्धवराव साळुंखे, सुजान कांबळे, दादाराव साबळे, गंडोपंत डोंगरे, रमेश रेणके, मंदाकिनी साबळे, अलका कांबळे यांच्या सह इतर शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास पंचायत समितीचे सदस्य. चित्तरंजन आण्णा सरडे , सरपंच सत्तार शेख , शाळेचे मुख्याध्यापक , शाळेचे आजी-माजी शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.