नळदुर्ग येथे माजी राष्ट्रपती डाँ सर्वपल्ली राधाक्रष्णन यांची जयंती साजरी

0
1134
Google search engine
Google search engine

लतीफ मामा शेख नळदुर्गनळदुर्ग येथे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षकदिनाचे औचित्य साधून नगरसेवक विनायक अहंकारी व बस्वराज धरणेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास येडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार लतीफ शेख, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, उत्तम बनजगोळे,इरफान काझी, अयुब शेख, सोमनाथ बनसोडे यांच्यासह शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सरदार सिंग ठाकूर,एम आय एम पक्षाचे शहराध्यक्ष मनसुर शेख ,शिव बस्व राणा समितीचे नवल जाधव ,पक्षीमित्र अमर भाळे हे उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त शिक्षक विजय कुमार यादगिरे,बलभीमराव मुळे,वसंतराव अहंकारी, काशिनाथराव नाईक,यशवंतराव रामदासी,उत्तमराव रामदासी,कांताबाई कुलकर्णी, श्रीमती ग्रामेपाध्याय मँडम, नेताजी गव्हाणे, माणिक गव्हाणे, बंडोपंत पुराणिक,रामकृष्ण महाबोले, रामचंद्र मुळे,तानाजी जाधव, दगडु जाधव,गरुनाथ मुळे, सुभाष महाबुले,शिवाजीराव वऱ्हाडे,हिराबाई पाटील, शिवाजी मिटकर,कुमठेकरसर,लोढेंसर कमलाकर कुलकर्णी यांच्या सह 32 सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आले. हा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक अहंकारी यानी केले तर अभार बस्वराज धरणे यांनी मानले.