डॉक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ७ व ८ सप्टेंबर खासगी दवाखाने बंद

0
763
Google search engine
Google search engine

शेगांव : डॉक्टरांवर वारंवार होणाºया हल्ल्याच्या निषेधार्थ ७ व ८ सप्टेंबरला सर्व खाजगी हॉस्पीटल बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडीकल असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. ५ सप्टेंबरला बुलडाणा शहरातील डॉ.मेहेर यांच्यावर एका आरोपीने रूग्ण तपासत असताना प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात डॉक्टरांच्या उजव्या डोळ्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून फ्रॅक्चर सुध्दा झाले आहे. त्यामुळे या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागत आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे याचा निषेध म्हणून बुलडाणा मेडीकल असोसिएशनने ७ व ८ सप्टेंबरला सर्व खाजगी हॉस्पीटल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.एल.के. राठोड, सचिव ए.एस. भवटे, राज्यस्तरीय विशेष सदस्य डॉ.जे.बी. राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलनात शेगांव आयएमएने सुध्दा पाठींबा दर्शविला असून दोन दिवस शेगांव शहरातील सर्व खाजगी दवाखाने बंद राहतील तर शेगाव ला डॉ असोशिअन ने तहसिल कार्यालय ला जावुन तहसील दारांना निवेदन देवुन निषेध व्यक्त केला व दोशीला शिक्षा व्हावी.