नरसिंग आखाडा व परीसर घाणीच्या विळख्यात,पैलवानांसह नागरीक कचाटले, विशाल भगत यांचा आंदोलनाचा ईशारा..

0
939

आकोट(प्रतिनीधी) – अकोटचे ग्राम दैवत नरसिंग मंदिर परीसरातील नरसिंग आखाडा तथा नरसिंग कॉलनीतील नागरीक घाणीच्या विळख्याला स्थानिक रहीवासी कचाटले आहेत.विशेष म्हणजे बाजुलाच चव्हाण शाळा आहे .तर त्या शेजारी आखाडा आहे .तसेच आजुबाजुला घरे आहेत .समोरूनही लोकांचे घर आहेत मात्र या परीसरातील उघड्यावर असणारा कचरा व नाल्यांमध्ये साठलेला प्लास्टिक पन्न्याचा खच या भागात मच्छरांचा उद्रेक होण्यास कारणीभूत ठरत आहे.

नागरिकांच्या जीवाशी चालणाऱ्या या खेळण्यामुळं डेंगू मरेलीया अशी तापाची साथ होऊ शकते त्यामुळं या परीसरात लवकरात लवकर सफाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन छेडु असा ईशारा प्रहारचे विशाल भगत यांनी दिला आहे.शहरात साथरोगांचा फैलाव होण्या आधी सफाई करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.