*स्क्रब टायफसच्या मृत्यूने वरुड तालुका हादरला – सर्दी तापाने सारेच बेजार ,दवाखाने हाऊस फुल्ल,वाडेगाव येथे एक दगावला*

0
1526
Google search engine
Google search engine

अतुल काळे / वरुड :-

तालुक्यातील पेठ मांगरुळी येथील स्क्रब टायफस मूळे 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून तालुक्यातील पहिलाच बळी असल्याचे सांगण्यात येते आहे .

परंतु यापूर्वी सुद्धा वाडेगाव येथील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा उपचाराकरिता दाखल आहे . अनेक रुग्ण दगावले नेमके ते कशामुळे दगावले याबाबत आरोग्य यंत्रणा आजही अनभिज्ञ आहे .स्क्रब टायफस मृत्यू झाल्याने तालुका हादरला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु या बाबत आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतली असती तर कदाचित हा प्रसंग ओढावला नसता अशी जनमानसात चर्चा आहे यावर्षी पावसाने रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी डबके आणि काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य अशी अवस्था या पावसामुळे झाली पाणी वाहते नसल्याचा परिणाम यश सांगण्यातून मच्छरांचा प्रादुर्भाव होऊन सर्दी ताप आणि खोकला ने तालुका बेजार झाला दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील पेठ मांगरूळी येथे स्क्रॅब टायफस रुग्ण पंकज श्रीराम ३५ हे नागपूरला नागपूरला व्हिनस क्रिटिकल केअर मध्ये उपचाराकरिता दाखल केले होते परंतु रक्त चाचण्यांमध्ये स्क्रब टायफस असल्याचे निष्पन्न झाले उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून या स्क्रब टायफस बाबत जनजागृती करणे करिता पत्रके छापून वाटण्यात आले तर काही भिंती पत्रके चर्चासत्र तसेच निवेदनाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे