उस्मानाबाद जवळ ऊंट तस्करी करणारा ट्रक पकडल्याने खळबळ

377

उस्मानाबाद – उस्मानाबाद जवळ ऊंट तस्करी ट्रक पकडला आसून त्या आरोपींना पकडून औरंगाबाद येथील सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे यात १४ ऊंट तस्करी करणारा ट्रक पकडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
दिनांक ७/९/२०१८ रोजी राजेस्थानहुन कर्नाटकात दोन ट्रक ऊंट घेऊन जात असताना औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रपाळीला गस्त घालणार्या पोलिसांच्या निदर्शनात दोन ट्रक आल्या होत्या त्या दोन्हीही ट्रक औरंगाबाद येथील सातारा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले होते त्या ट्रकचे क्रमांक 74 A 9954 व HR 74 A 9467 असे होते त्यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात NC -NO 20/2018 कलम 11 प्राण्यास निर्दयीपणे वागवणे अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतू सातारा पोलिसांना ऊंट तस्करांनी दोन्ही ट्रक ठाण्यातून पळवले होते सातारा पोलीसांनी तात्काळ सर्वत्र वायरलेसवर माहिती देऊन नाकाबंदी केली दरम्यान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील येडशी जवळील टोलनाक्यावर महामार्ग पोलिस केंद्राचे उस्मानाबाद चे पोलीस कर्मचारी वहानांची तपासणी करत आसताना दोनपैकी एक ट्रक क्रमांक HR 74 A 9954 हा दिसताच पोलिसांनी तत्परतेने पकडला या ट्रकमध्ये एकूण १४ ऊंट होते ट्रक चालक महमद हमजाद सादिक वय ३५ वर्ष रा हरियाणा (घसेडा) ता जि नुहू याला फकडून उस्मानाबाद ग्रामिण पोलीस ठाण्यामार्फत औरंगाबाद येथील सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे परंतू एक ट्रक गायब आसल्याची चर्चा आहे या कार्यवाहीमुळे आंतरराष्ट्रीय प्राण्यांची तस्करी करणार्यांना चाप बसणार आहे