उस्मानाबाद – येडशीत बैलपोळा ऐवजी ट्रँक्टर पोळा शेतकर्यांनी केला साजरा

0
1699

हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद मो-9623261000

उस्मानाबाद – तालुक्यातील येडशी येथील ज्या शेतकर्याजवळ बैल नाहीत जे शेतकरी ट्रँक्टरवर शेती करतात अशा शेतकर्यांनी चक्क येडशी येथील जनता विद्यालयासमोरून ट्रँक्टरवर फुलांची सजावट करून बैलांची जशी मिरवणुक काढतात तशा प्रकारची ट्रँक्टरची मिरवणुक काढली आहे

या मिरवणुकित जवळपास पन्नास ट्रँक्टरचा सहभाग दिसत आहे यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात हि पहिलीच मिरवणूक आहे या मिरवणुकीमुळे आज बैलपोळा सणाऐवजी ट्रँक्टर पोळा सण आसल्यासारखे चित्र येडशीकरांना पहायला मिळाले