रूरल इस्टिट्यूट च्या मैदानात पोळा उत्सव संपन्न- श्री वैभव इंगळे यांचा बैल जोडीला पहिला क्रमांक -खासदारांचा हातून बक्षिण वितरण

0
1108
Google search engine
Google search engine

अमरावती:- सध्याचा यांत्रिकीकरणाचा काळात बैल हे छोट्या शेतकऱ्यांचा आधारस्तंभ आहेत काळानुसार हळूहळू बैलांच्या महत्व शेतकऱ्यांसाठी कमी होत आहे तरीही मोठ्या उत्साहाने श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व जनता कृषी विद्यालय अमरावती द्वारा पोळा उत्सव दरवर्षी प्रमाणे रूरल इस्टिट्यूट च्या मैदानात भरवण्यात आला यावेळी

प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्री आनंदराव अडसूळ, श्री राजेश वानखडे.जिल्हाध्यक्ष शिवसेना,
कार्यक्रम अध्यक्ष श्री दिलीपभाऊ इंगोले,
श्री नंदकिशोर चिखले, होर्टिकल्चर चे प्राचार्य श्री डॉ शशांक देशमुख, श्री पी.व्ही देशमुख , श्री सुनील खराटे शिवसेना शहरप्रमुख , गाडगे नगर चे ठाणेदार श्री ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

यावेळी श्री आनंदराव अडसूळ हे बोलताना म्हणाले की- शेतकरी आणि बैल यांचं अतूट नाते आहे ते 24 तास सोबत असतात , खेड्यांचा शहरीकरण झाल्यामुळे खेड्यातील लोक आता शहराकडे येऊ लागली आहे आताच यांत्रिकीकरणाचा काळात पूर्वीसारखी बैलांची गरज आता शेतकऱ्यांना वाटत नाही शेकडो बैलजोड्या आधी यायचा आता 5 ते 6 जोड्या फक्त पाहायला मिळतात, भविष्यात देखील हा असा कार्यक्रम नेहमी सुरू रहावा असं मत खासदारांनी व्यक्त केलं.

पहिला क्र – वैभव इंगळे कोणार्क कॉलनी अमरावती

दुसरा क्र – रामरावजी वानखडे नवसारी अमरावती

तिसरा क्र – श्री नितीन ठाकरे रोशनी स्वीट मार्ट

चौथा क्र – प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती

पाचवा क्र – जनता कृषी तंत्र विद्यालय अमरावती