*शेंदूरजना घाट पोळा बाजारावर तालुक्यातील कमी पावसाचे पडसाद-निसर्गाच्या अवकृपेचा दुकानदारांना फटका*

0
1508

वरुड (अतुल काळे )

तालुक्यातील शेंदूरजना घाट पोळा बाजार शेतीला अवजारासाठी प्रसिद्ध असून यंदा पावसाळ्याच्या सुरवाती पासून कमी पाऊस झाल्या मुळे त्याचे पडसाद पोळा बाजारावर पण पडलेले दिसून आले आहे. निसर्गाच्या अवकृपेचा बळीराजा हवालदिल झाल्याने पोळ्याचा उत्साह कमी दिसून आला आहे .परिणामी याचा फटका पोळा बाजारातील दुकानदारांना त्यामुळे त्यानंही निराशा आली . तब्बल १५० वर्षाची परंपरा असलेल्या शेंदूरजना घाट येथील पोळा बाजार शेतीच्या आजारासाठी प्रसिध्द आहे. या शिवाय या बाजारात लाकडी फर्निचर तसेच इलेक्ट्रोनिक साहित्याचे दुकाने लागतात.त्याच बरोबर या बाजारात आटो डील दुकाने लागत आहे.बैलाचे साहित्य व शेतीचे अवजारे मिळणारा हा बाजार पूर्वी एका दिवसाचा भरायचा .परंतु दिवसेंदिवस या बाजाराचे स्वरूप बदलले . व्याप वाढून बाजारात कोटी ची उलाढाल या बाजारात होत होती. शेतकऱ्यांचा व आजू बाजूच्या सर्व गावकाऱ्यांचाही या पोळ्या निमित्य भरणाऱ्या या बाजाराला चंगला प्रतिसाद मिळत होता.

त्यामुळे यावर्षीही चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा येतील दुकानदारणा होती .यावर्षी सुरवाती पासून पावसाळा जोर नसल्याने खरीप पिके उत्पन्नत भारी घट दिसून येणार आहे.तसेच गेल्या काही वर्षात आलेली दुष्काळी परिस्थिती यावर्षी ही कायम करण्याची शक्यता आहे.तसेच शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असल्याने यावर्षी पोळा बाजारात कमी पाऊसमनाचे पदरात दिसायला मिळत असून दुकानदार ,व्यापारी याची निराशा झाली आहे.