चांदूर रेल्वे येथील चोरीचा अमरावती एलसीबी ने २४ तासांत लावला छडा – भरदुपारी १८ हजारांची रोकड दुकानातुन केली होती लंपास

0
786
Google search engine
Google search engine

दोन्ही आरोपी अमरावती येथील बेलपुऱ्यातील रहिवासी

सि. सि. टी. व्ही. कॅमेरामध्ये कैद झाले होते आरोपी

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)

   चांदूर रेल्वे शहरातील एका दुकानातील भरदिवसा १८ हजारांची रोकड उडविणाऱ्या आरोपींना अमरावतीच्या एलसीबी पथकाने २४ तासांच्या आत जेरबंद केले.

     सविस्तर माहितीनुसार, चांदूर रेल्वे शहरातील खडकपुरा यथील रहिवासी मोहम्मद जाफर मोहम्मद सिद्दीक यांच्या मालकीचे मोटार  इलेक्ट्रीकल्स अँड स्पेअर पार्टचे (हार्डवेअर) आठवडी बाजाराजवळील बोहरा गल्लीमध्ये दुकान आहे. आरोपी कपील रमेश भाटी (२२) व कैलास गणेशसिंह चव्हाण (३८) दोघेही रा. बेलपुरा, अमरावती हे रविवारी (ता. ९) दुपारी २ ते २.३० वाजताच्या दरम्यान मो. जाफर यांच्या दुकानात जाऊन मार्बल कापण्याचे ब्लेड मागितले व ते दुकानदाराने त्यांना दिले. त्यानंतर आरोपींनी एलबो ची मागणी केले असता मो. जाफर हा बाजुला एलबो आणण्यासाठी गेला. यावेळी काऊंटर समोर उभे असलेल्या दोन्ही आरोपींना काऊंटरमधील १८ हजारांची रोकड दिवसाढवळ्या व बाजाराचा दिवस असतांनाही एवढ्या गर्दीत लंपास केली. ही बाब मो. जाफर यांच्या लक्षात येताच त्यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार नोंदविली. दिवसाढवळ्या चोरी झाल्यामुळे सदर माहिती एलसीबी अमरावती ला देण्यात आली. काही वेळातच एलसीबी टिम रविवारी चांदूर रेल्वेत पोहचली होती. त्यांनी एका दुकानाजवळ लागलेला सि. सि. टी. व्ही. कॅमेरा फुटेज पाहले असता दोन्ही आरोपी यामध्ये दिसुन आले. याच आधारे अमरावती एलसीबीने तपास चक्रे वेगाने फिरवित आरोपी कपील भाटी व कैलास चव्हाण यांना अमरावती मधील बेलपुरा येथील घरातुन बेड्या ठोकल्या. सदर कारवाई केवळ २४ तासांच्या आत करण्यात आली असुन आरोपींनी गुन्हा कबुल केल्याचे समजते. सोमवारी दुपारी २.४५ वाजता दोन्ही आरोपींना चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला आणण्यात आले. दोन्ही आरोपींविरूध्द कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास स.पो.नि. एस. के. जाधव करीत आहे.