दर्यापुर तालुक्यातील हजारो क्विंटल मुंग शेतकऱ्यांच्या घरात – तत्काळ नाफेड केंद्र सुरू करण्याची मागणी,सहाय्यक निबंधकांना आठ दिवसाचा एल्टीमेटम -प्रहार आक्रमक

0
970
Google search engine
Google search engine
अमरावती़ / विशेष प्रतिनिधी –
जिल्ह्यात सर्वाधिक मुंगाचे उत्पन्न होत असलेल्या दर्यापुर तालुक्यातील हजारो क्विंटल मुंग शेतकऱ्यांच्या घरात पडुन असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने याची दखल घेत सहायक निबंधकाकडे निवेदन सादर केले़ येत्या आठ दिवसात मूंग खरेदी करीता नाफेडचे केंद्र सुरू न केल्यास सहायक निबंधक कार्यालय ताब्यात घेवु असा इशारा प्रहार संघटनेचे श्री प्रदीप वडतकर, विधानसभा प्रमुख श्री प्रदीप चौधरी यांनी दिला़ याबाबत संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देखील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे़
जिल्ह्यात आधीच शेतकरी सततच्या नापिकीमुळे हवालदील झाला आहे़ यातुन मार्ग काढत शेतकऱ्यांने या पावसाळी हंगामात कसाबसे मुंग आणि उडीदाचे पिक घेतले़ दर्यापुर तालुका हा खारपान पट्टा असुन देखील तेथे शेतकऱ्यांनी सर्वाधिक मुंगाचे पिक घेतले़ परंतु शेतकऱ्यांना मातीमोल दरात मुंगाची विक्री करावी लागत असल्याचे वास्तव दर्यापुर तालुक्यात पाहावस मिळत आहे़ नाफेडचे केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्त दलांना मार्फत हमीभावापेक्षा कमी दराने मुंगाचे विक्री करावी लागत आहे शासकीय दर ६ हजार ९७० असतांना दलालांमार्फत ४ ते ४५०० दराने मुंग खरेदी करून शेतकऱ्यांची लुट चालविली आहे़ नाफेडचे केंद्र सुरू केले असते तर आज शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले नसते़ शेतकऱ्यांची ही व्यथा जाणुन प्रहार संघटनेचे प्रदीप वडतकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्ते तालुका सहनिबंधक यांच्या कार्यालयावर धडकले़
येथे तत्काळ बैठक लावुन संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली़ बैठकीला सहायक निबंधक राजेंद्र सुने, सहकार अधिकारी डी डी दारमोडे,कृषी कृउबास चे सचिव हिम्मत मानकर यांची उपस्थिती होती़ येत्या आठ दिवसात जर नाफेडने मुग खरेदी करिता केद्र सुरू न केल्यास सहायक निबंधक कार्यालय ताब्यात घेवु असा इशारा देखील यावेळी देण्यात आला़ सोबत बाजार समितीमध्ये दलालांचे धान्य ठेवण्याकरिता उपलब्ध असलेले गोडावुन भाडयाने दिले़ आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांची मुंग,उडीद आणि सोयाबिनची खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांचे धान्य ठेवण्याकरिता गोडावुनच उपलब्ध नसल्याने याची दखल घेवुन तत्काळ गोडावुन खाली करावे, नाफेड केंद्र वर्षभर सुरू ठेवावे, शासनाने माल खरेदी केल्यानंतर त्याचवेळी धनादेशव्दारे चुकारा करावा अशा मागणी देखील यावेळी करण्यात आली़ कारण मागील वर्षीचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना पाण्यातच आपला माल साठवावा लागला होता़ त्यामुळे यावर्षी अशी परीस्थिती निर्माण होवु नये याकरिता गोडावुन खाली करण्याची मागणी करीत अधिकाऱ्यांना प्रहारचे श्री  प्रदीप वडतकर यांनी खडेबोल सुनावले़ यावेळी दर्यापुर विधानसभा प्रमुख श्री  प्रदीप चौधरी, श्री  सुधिर प्रवित्रकार श्री  बापुसाहेब साबळे,श्री  दिनेश म्हाला,श्री  पप्पु पाटील गांवडे, श्री रीतेश बारहाते,अनूप गांवडे, अमीत धांडे, कृणाल नागे, बंटी धर्माळे आदींची उपस्थिती होती़