बंदच्या हाकेला चांदूर रेल्वेत उत्स्फुर्त प्रतिसाद

0
612
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
   इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने १० सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली होती. त्याच अनुषंगाने सोमवारी चांदूर रेल्वे शहरात भारत बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून चांदूर रेल्वेतील बाजारपेठा, शाळा – महाविद्यालये कडकडीत बंद होते.
   सतत वाढत चाललेल्या पेट्रोल, डिझेलमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाजपा सरकारने सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासने जनतेला दिली होती. परंतु सत्तेत येऊन ४ वर्ष झाली तरी देखील अनेक आश्वासने सरकारने पूर्ण केली नाही. या विरोधात जनतेमध्ये कमालीचा रोष आहे. वाढत्या महागाईच्या भडक्यात सर्व सामान्य जनता भरडल्या जात असुन गोर गरीबांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे वाढत्या इंधनाच्या दराविरोधात काँग्रेसने सोमवारी बंदचे आयोजन केले होते. त्याला चांदूर रेल्वेत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रॅलीव्दारे फिरून चांदूर रेल्वे शहर सकाळी ९ वाजतापासुन कडकडीत बंद ठेवले होते. त्यांनंतर उपविभागीय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांना निवेदन देऊन जनतेची होणारी लुट थांबविण्याची मागणी केली आहे. यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रदिप वाघ, माजी सभापती प्रभाकर वाघ, उपसभापती भानुदास गावंडे, नगराध्यक्ष निलेश ऊर्फ शिटू सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे, परिक्षीत जगताप, बंडू देशमुख, जगदिश आरेकर, बंडू मुंधडा, शहर अध्यक्ष श्रीनिवास सुर्यवंशी, सलीमसेठ जानवानी, नगरसेवक प्रणव भेंडे, महेश कलावटे, प्रफुल्ल कोकाटे, अनिस सौदागर, शहेजाद सौदागर, संदिप शेंडे, अशोक चौधरी, अमोल होले, पवन बजाज, विनोद ठाकरे,  प्रभाकर सोनवणे, विनोद काळमेघ यांसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.