स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत यश

0
695
Google search engine
Google search engine

येवला (प्रतिनिधी) संतोष बटाव

क्रीडा व युवक सेवा संचालनालय , पुणे तथा क्रीडा अधिकारी कार्यालय , नाशिक .आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या .यात येवला येथील नामांकित स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेज येवला .११वी सायन्सचा विद्यार्थी जयेश नाना काळे -६२किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला .व सुवर्णपदक पटकावले .त्यामुळे जयेश काळेची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .जयेश काळे यास कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. जीजे सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे .
जयेश काळेंनी मिळवलेल्या सुवर्णपदक कामगिरीमुळे येवल्यातून सर्वस्तरातून त्याचे कौतुक होतंय .त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शरद नागडेकर ,सचिव श्री दीपक गायकवाड प्राचार्य प्रा. चिंचले प्रा खैरे सर प्रा. कोकणे क्रीडा शिक्षक भागवत सर , पैठणकर सर, वखारे सर ,प्रा. बोराडे कॉलेजचीसर्व प्राध्यापक -प्राध्यापिका ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

प्रतिनिधी/ संतोष बटाव . येवला मो.9850576769