उस्मानाबाद – अनोळखी महिलेच्या प्रेताने जिल्ह्यात खळबळ

0
1763

उस्मानाबाद- लोहारा तालुक्यात अनोळखी महिलेचा म्रतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे सोलापूर-उमरगा या राष्ट्रीय महामार्गावरील भोसगा पाठी येथे रस्त्याकडेला असलेल्या साठवण तलावाजवळ एका अनोळखी महिलेचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा खून करून मारून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक केला जात आहे.घटनेची माहिती मिळाल्यावरून मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.या घटनेच्या तपास कामी कांही माग निघतो का यासाठी उस्मानाबाद येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.मुरूम पोलिसांकडून घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.पोलीस तपासातून घटनेचा उलगडा होणार असून घातपात की आणखी कांही हे अधिकच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.