चिखली वकील संघाच्या अध्यक्षपदी अँड.सलीम शेख

0
1013
Google search engine
Google search engine

(चिखली):-

चिखली वकील संघाची निवडनुक मंगळवार (दि. 12) सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. चिखली वकील संघाच्या यंदाच्या सन 2018-19 या वर्षाच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत वकील संघाचे युवा सदस्य अँड.सलीम एम.शेख यांनी बाजी मारली आहे.

यावेळी अध्यक्ष पदाकरिता झालेल्या निवडणुकीत एकूण 79 सभासदांनी मतदान केले. या पदासाठी अँड. सलीम शेख , अँड.एल.सोळंकी , अँड.रामदास तिडके, हे निवडणूक लढवीत होते. निवडणूक अटीतटीची होउन अँड.सलीम शेख यांना 44 मते व अँड. सोळंकी यांना 35 तसेच मत मिळाली. अँड.सलीम शेख यांचा ०९ मतांनी दणदणीत विजय झाला.

झालेल्या निवडणुकीत निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून अँड.किशोर मुंडलीक यांनी काम पाहिले. तसेच सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून अँड.वैशाली बोराडे व अँड.आर. व्हीं.डोंगरदिवे यांनी काम पहिले.अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माझी अध्यक्ष व सर्व सदस्यांनी केला . तसेच त्यांचे अभिनंदन सर्व वकील बंधूंनी केले.