बाप्पांचे आकोटात जल्लोषात आगमन

0
774
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके – महाराष्ट्राचं लाडकं दैवत… आबालवृद्धांचा आवडता देव… गणरायाचे आज आकोटात पारंपरिक वाद्यांच्या गजरात ढोल ताशांच्या निनादात जोरदार स्वागत झाले. बाप्पांच्या आगमनाने दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला असून आज सकाळपासून घरोघरी गणपतीच्या स्थापनेची लगबग सुरू होती. विशेष म्हणजे बाप्पांना आवडणाऱ्या दुर्वा ,लाल फुले मोदकांना सगळीकडे मागणी होती .शहरात सुमारे 70 च्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून त्यातील जवळपास 48 मंडळ मुख्य मिरवणुकीत सहभागी होत असतात. शहरातील नरसिंग मंदिर प्रांगणातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे लोकमान्य टिळकांच्या हस्ते स्थापलेले असून मंडळाची यंदा शतकोत्तर सहावे वर्ष आहे त्याशिवाय गणेशोत्सवानिमित्त शहरातील पुरातन ऐतिहासिक भोसलेकालीन सिद्धिविनायक तथा पुरातन गणेश मंदिर येथेही भाविकांनी श्रींच्या दर्शन अभिषेक तथा पूजनासाठी गर्दी केली आहे यावर्षी शहरात अनेक ठिकाणी श्रींच्या भव्यदिव्य मूर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सवलाही जोरदार प्रतिसाद देत मातीच्या गणपतींना पसंती दिली आहे . बाप्पाच्या आनंददायी आगमनाने सगळीकडे वातावरण प्रसन्न झाले असून दहा दिवस उत्सव विविध उपक्रम तथा पूजा पठण अभिषेक व अन्नदान संपन्न होणार आहे. यानिमित्त आजपासूनच घरोघरी सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची या आरतीचे सूर ऐकायला येत आहेत.