खाकीतल्या माणुसकी वर आकोटात शुभेच्छांचा वर्षाव

0
1752
Google search engine
Google search engine

आकोट/ संतोष विणके – आकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट शहरवासीयांनी त्यांच्यावर अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव केला. माणुसकीचा ओलावा जपणारे संवेदनशील मनाचे अधिकारी म्हणून गजानन शेळके हे प्रसिद्ध आहेत. पोलिस खात्यात असल्यावरही गुन्हा घडल्यावर तपास करण्यापेक्षा गुन्हा न घडावा यासाठी ते सदैव त्यांचे विविध सामाजिक प्रयोग राबवत असतात. संवेदनशीलतेचा डाग असलेले आकोट शहर ही सामाजिक समरसतेतही कुठेच कमी नसल्याचं खाकीला मिळणाऱ्या प्रतिसादातून जाणवत आहे.गुन्हेगारी समस्या शिवाय कायद्याच्या दृष्टीने असणाऱ्या सामाजिक समस्यांही ठाणेदार शेळके यांनी प्रभावी पद्धतीने हाताळल्या आहेत. विशेष म्हणजे एक नवीन उपक्रम म्हणुन ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करीत असल्याने ठाणेदार शेळके ज्येष्ठ नागरिकांना वर्दीतले श्रावणबाळच वाटतात. ज्येष्ठ नागरिक निराधार महिला यांच्या प्रती असणारा माणुसकीचा ओलावामुळे काल झालेल्या त्यांच्या वाढदिवसाला शहरातील ज्येष्ठ नागरिक महिलांनी त्यांना शुभेच्छा देण्यास तुफान गर्दी केली होती.विशेष म्हणजे या आधीपण त्यांनी निराधार महिलेचे वृद्धाश्रम आजीवन राहाण्याची सोय करून दिली असून त्यांच्या या कृतीने खऱ्या अर्थाने समाजऋण फेडल्याचे उदाहरण दिसते. एवढेच नव्हे तर ठाणेदार गजानन शेळके तरुण मंडळी विद्यार्थी वर्ग व जनसामान्यांमध्ये पण आपुलकीचा अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.खाकीतल्या या संवेदनशीलतेला आमचाही सलाम!