बशिर खान यांचे निधन

165
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान)
    चांदूर रेल्वे येथील जेष्ठ पत्रकार युसुफ खान यांचे मोठे बंधु तथा तालुक्यातील घुईखेड येथील प्रतिष्ठीत नागरीक बशिर खान यासीन खान यांचे वृध्दापकाळाने बुधवारी दुपारी दुख:द निधन झाले. मृत्युसमयी ते ६६ वर्षांचे होते.
     त्यांच्या मनमिळावु वृत्तीमुळे ते सर्वदुर परिचीत होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. आज गुरूवारी त्यांच्यावर घुईखेड येथील कब्रस्थानमध्ये सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यामागे पत्नी, विवाहीत २ मुले, २ मुली, जावाई, सुन, नातवंडासह बराच मोठा आप्तपरिवार आहे.
Attachments area