तेर बस स्थानकातील प्रवाशांच्या घशाला कोरड, परिसारात घाणीचे साम्राज्य ,नेते पुढारी देतील का याकडे लक्ष ??

0
926
Google search engine
Google search engine

तेरच्या बस स्थानकात घाणीचे साम्राज्य ,प्रवाशांच्या घशाला कोरड ,नेते पुढारी देतील का लक्ष ??

हुकमत मुलाणी मो-9623261000

उस्मानाबाद – उस्मानाबाद तालुक्यातील तेर हे संताची नगरी म्हणुन या गावची ओळख,आहे हि संताची मानली जाते या ठिकाणी महाराष्ट्रातून भावीक भक्त मोठ्या संख्येने श्री संत गोरोबा काकांच्या मंदिरात दर्शनासाठी येतात परंतू या तेर येथे असणार्या बस स्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आसल्यामुळे भाविक भक्तामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे

बस चालक वाहक यांनाही या बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे त्यांचाही घसा कोरडाच

या बस स्थानकातून दर दिवसाकाठी ८० बस फेर्या मारतात या बस स्थानकातून ५००० ( पाच हजार ) च्या जवळपास प्रवाशांची चढऊतार होते या बस स्थानकाच्या धरण उशाला आहे अन् कोरड प्रवाशांच्या घशाला पडत आहे सध्या बस स्थानकामध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध नाही स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या तोट्या तोडलेल्या दिसत आहेत तर खिडक्यांची तोडफोड केलेली दिसली तर रेस्टाँरेंट हि बंद आहे बस स्थानकात दुर्गधीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले आहे परिसरातील लोकही या स्थानकाला खुलेआम प्राता विधी ऊरकतात या ठिकाणी गुडमाँर्नींग पथकाची कार्यवाही केली तर गैरसोय दुर होईल तसेच

या स्थानकात शौचालय आहे परंतू त्या शौचालयात मोठ्या प्रमाणात घाणिचे साम्राज्य आहे ते शौचालय हि बंद आहे मुतारीचा झणझणीत सेंट येतो बस स्थानकाला कंपाऊंड नसल्यामुळे खाजगी वाहनांचाही या ठिकाणी वावर दिसला तेर हे गाव माजी ग्रहमंत्री डाँ पद्मसिंह पाटिल यांचे मुळ गाव आहे सध्या उस्मानाबाद कळंब चे आमदार राणाजगजितसिंह पाटिल हे प्रतिनिधीत्व करतात तेरचे गावचे सरपंच महादेव खटावकर हे आहेत उपसरंच बाळासाहेब कदम आहेत तर जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटिल याच गावच्या आहेतया खालील बाबींकडे लक्ष देऊन या होणार्या सुविधांचा अभाव दूर करावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे