मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशालीताईंच्या प्रयत्नाला यश, अखेर शिक्षणाधिकारी सचिन जगताप निलंबित

0
1823
Google search engine
Google search engine

मनसेच्या जिल्हाअध्यक्षा वैशालीताईंच्या प्रयत्नाला यश,अखेर शिक्षणाधिकारी सचिन जगताप निलंबित

निलंबीत शिक्षणाधिकारी सचिन जगताप

उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता पण त्यांच्यावर कार्यावाही होत नसल्यामुळे मनसेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा व जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी मनसेच्या कार्यकरत्यांना घेऊन शिक्षणाअधिकारी यांच्या कार्यालयावर शाई फेकून चप्पलांचा हार घालून आंदोलन केले होते नंतर मनसेच्या जिल्हाअध्यक्षा खळ खट्याक फेम वैशाली गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर राँकेल ओतून घेऊन आंदोलन केले होते

त्यांच्या प्रयत्नाला अखेर आज यश आले असून आज सचिन जगताप यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे या कार्यवाहीमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे पुढिल आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला येईपर्यंत निलंबीत राहतील असे पत्रात नमुद करण्यात आले आहे उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील एका शिक्षिकेने शिक्षणअधिकारी सचिन जगताप यांच्यावर शिक्षण विभागातील महिलेने आनंद नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता नंतर जगताप हे फारार होते त्यांना न्यायालयाने अटपूर्व जामिन नामंजूर केल्यामुळे सचिन जगताप हे स्वताहून २२ मे रोजी आनंद नगर पोलिस हजर झाले होते त्यांची चार दिवसासाठी न्यायालयीन कोठडित रवानगी करण्यात आली होती जगताप यांना अटक केलेल्या वेळेपासून ४८ तासापेक्षा जास्त वेळ पोलिस कोठडित असल्याने महाराष्ट्र नागरी सेवेच्या नियमाप्रमाणे निलंबन केल्याचे आदेशात म्हाटले आहे हा आदेश अप्पर मुख्य सचिवांनी काढला आहे आहे आदेश आमलात असेपर्यत सचिन जगताप यांना शासनाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही तसेच त्यांना खाजगी नौकरी किंवा व्यवसाय करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे असे वर्तन केल्यावर त्यांना दोषी ठरवून कार्यवाही करण्यात येईल यात त्यांना दोषी ठरवून निर्वाह भत्त्याचा हक्क गमवावा लागेल असे आदेशात म्हटले आहे
हे प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडिच्या जिल्हाअध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी लावून धरून आंदोन केले होते त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे त्यामुळे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात मनसेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे