शंभू महादेव साखर कारखान्याचा सोमवार पर्यंत निर्णय घ्या अन्यथा विराट मोर्चा काढू – सुरेश पाटिल

829

उस्मानाबाद – कळंब तालुक्यातील हावरगाव येथिल शंभू महादेव साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या रक्कमेबाबत तहसिलदारांनी सोमवार पर्यंत काही निर्णय घेताला नाही तर मंगळवारी तहसिल कार्यलयावर शेतकर्यांचा मोर्चा काढण्यात येईल असा इशार एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटिल यांनी तहसिलदारांना इशारा दिला आहे शुक्रवारी शेतकऱ्यांच्या वतीने कळंबच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले
शुक्रवारी कळंबच्या नायब तहसिलदार परविन पठाण यांची शिष्टमांडळाने भेट घेतली एस पी शुगर चे चेअरमन सुरेश पाटील शिवाजी कापसे अजित पिंगळे प्रा दिलीप पाटील सतपाल बनसोडे राजाभाऊ मिटकरी आबासाहेब रणदिवे चक्रधर कोल्हे यांआदि शिष्टमंडळाचे पदाधीकारी उपस्थित होते नायब तहसिलदार पठाण मँडम यांना शंभू महादेव,साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या उसबिलाच्य रक्कमेच्या येणे बाबत सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन दिले की शंभु महादेव कारखानाकडे परीसरातील शेतकर्यांचे 9कोटी 70 लाख रुपये येणे बाकी आहे साखर आयुक्त पुणे यांनी कारखानाची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांना उस बिल द्या असा आदेश दिला होता माञ या पुर्विच वैद्यनाथ बँकेने कारखान्याच्या मालमत्ता विक्रीस स्थगीती आनली व शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा प्रश्न लटकुन राहीला त्यानंतर बँकेने हायकोर्टाची आँर्डर नसताना डी डी एन या कारखान्याला शंभु महादेव कारखाना दिला शेतकर्यांचे बिल देण्यापुर्विच बँकेने कारखाना विकुन फसवणुक
केली आहे डीडीएन या कारखानाचे लोक शभु महादेव कारखान्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत जो पर्यत शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस बिलाची रक्कम मिळत नाही तोपर्यत कारखान्यात जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे मुळ मालक दिलीप आपेट यांच्याबरोबर कायदेशिर व्यवहार न करता कारखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या डीडीएन कारखान्यावर गुन्हा दाखल करावा सोमवार पर्यत जर या मागण्या मान्य झाल्या नाहीतर मंगळवारी तहसिल कार्यालयावर शेतकर्यांचा विराट मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन देण्यात आले या निवेदनावर पाचशे शेतकर्यांच्या सह्या आहेत

प्रतिक्रिया सुरेश पाटिल, चेअरमन एस पी शुगर , कसबे तडवळे

तहसिलदारांनी जर सोमवार,पर्यंत यावर योग्य निर्णय घेतला नाही तर मंगळवारी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात येईल

सुरेश पाटील , चेअरमन एस पी शुगर

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।