आकोट नगर पालीकेच्या “स्वच्छता हीच सेवा” मोहीमेचा शुभारंभ

0
789
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके –
स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत आकोट शहरात *स्वच्छता हीच सेवा* ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून या मोहीमेत आकोट शहरवासियांनी सहभागी होवून स्वच्छ व सुंदर शहरासाठी कृतसंकल्प व्हावे.असे आवाहन नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांनी केले आहे.

आकोट नगरपरिषदे द्वारा मुख्यअधिकारी प्रशांत रोडे यांचे मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर ते २आक्टोंबर दरम्यान स्वच्छता विषयक विविध कार्यक्रम हाती घेण्यात आली आहेत।या कार्यक्रमात लोकप्रतिनी,नगरसेवक ,अधिकारी ,
कर्मचारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी तथा समस्त नागरिकांनी सहभागी व्हावे.तसेच स्वच्छता ही जनचळवळ व्हावी अशी अपेक्षा नगराध्यक्ष माकोडे यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष यांचे हस्ते *”स्वच्छता ही सेवा”* मोहीमेचा आज शुभारंभ झाला.
महात्मा गांधी व संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पुजन पार पडले.मुख्यअधिकारी प्रशांत रोडे यांनी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहीती देवून सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी यावेळी विनंती केली.

याप्रसंगी प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.नगर सेवक मंगेश लोणकर,शिवदास तेलगोटे,रविंद्र केवटी,बाळासाहेब घावट, आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता रोशन कुमरे यांनी केले.

पहिल्याच दिवशी नगरपरिषद कार्यालय परिसर, प्रभाग क्र.४मध्ये डोहरपूरा,मातंग पुरा,राहुल नगर,गुजर प्लाॕट परिसरात श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली,

या मोहीमेत आरोग्य विभाग प्रमुख ज्ञानेश्वर घरडे
आरोग्य निरिक्षक चंदन चंडालिया, निरिक्षक सर्फराज खान, प्रदिप रावणकार,आस्थापना प्रमुख ईश्वर पवार, , ,करअधिक्षक गौरव लोंदे,अभियंता नंदन गेडाम, ग्रंथपाल संजय बेलुरकर,।यांचेसह सर्व शिक्षकवृंद न प कर्मचारी ,सफाई कर्समचारी व नागरिक सहभागी झाले होते.

स्वच्छता हीच सेवा ही व्यापक मोहीम २ आक्टोंबर पर्यंत राबविण्यात येत असून शहरातील दवाखाने,उद्याने,पुतले व स्मारके, वाहन तले, बस स्थानक,सार्वजनिक शौच्यालये, मंदिर मज्जीद,बुद्ध विवार चर्च आदी सार्वजनिक स्थलांची स्वच्छता करण्यात येणार आहे,

यासोबतच नगरपरिषद प्राथमिक शाळामध्ये स्वच्छ शाळा मोहीम राबविण्यात येत असून स्वच्छता विषयक विविध स्पर्धा व उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे.

नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा,उघड्यावर शौच्यास बसू नये करिता पालिकेचे गुड माँर्निंग,गुड नुन, गुड नाईट पथक सक्रिय करण्यात आली असून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे।

या मोहीमेत विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था तथा समाजातील सर्व घटक ,लोकप्रतिनिधी,कर्मचारी,शिक्षक ,विद्यार्थी व महिला युवक युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यअधिकारी प्रशांत रोडे यांनी केले आहे।