पोलीसाकडून गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांना गोळ्या घालण्याची धमकी

0
1559
Google search engine
Google search engine

पोलिस कर्मचाऱ्यांने दारुच्या नशेत गोंधळ घालून गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गोळ्या घालीन म्हणून धमकावणाऱ्या पोलीस कर्मचारी विरोधात कारवाई करावी अशी मागणी गणेशमंडळाच्या पदाधिकारी व शहरवासीयांच्यावतीने केली जात आहे

उस्मानाबाद- दारुच्या नशेत गोंधळ घालून गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गोळ्या घालीन म्हणून धमकावणाऱ्या पोलीस कर्मचारी विरोधात कारवाई करावी अशी मागणी गणेशमंडळाच्या पदाधिकारी व शहरवासीयांच्यावतीने केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि 13 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहरातील सर्व गणेश मंडळानी गणेश मुर्तीची स्थापना करून आपल्याला मंडळाच्या पेंडाल समोर थांबले असता नळदुर्ग बसस्थानकासमोरील पोलीस चौकीत कार्यरत असलेला पोलीस महाशय व त्यांचा बगल बच्चा असलेला एक होमगार्ड दारुच्या नशेत बेधुंद अवस्था मध्ये अचानक गणेश मंडळाच्या मंडपासमोर प्रकट होऊन त्याठिकाणी उपस्थित गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याना शिवीगाळ करुन दमदाटी करीत वादविवाद घालण्यस सुरवात केली असता दारुच्या नशेत असलेल्या पोलीस कर्मचारी व होमगार्डला समजावण्याचा प्रयत्न मंडळाचे कार्यकर्ते करीत असताना तुम्ही माझ्या नादाला लागु नका नाही तर गोळ्या घालीन म्हणत गोंधळ घातला हा प्रकार एका ठिकाणी नव्हे तर शहरातील धर्मवीर संभाजीराजे तरुण गणेश मंडळ, न्यु चैतन्य तरुण गणेश मंडळ याच्या सह चावडीचौक व इतर ठिकाणी गोंधळ घातला .हा गोंधळ सुरु असताना नगरसेवक विनायक अहंकारी व महालिंग स्वामी यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र दारुच्या नशेत धुंद असलेल्या दोघांनी उलट दोन्ही नगरसेवकांना अरेरावी भाषेचा वापर करीत नंगानाच घातला. झालेल्या गोंधळामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत दोघांच्या विरोधात तात्काळ कडक कारवाई व त्यांची बदली करावी अशी मागणी केली आहे. हा झालेला तमाशा मुळे नगरसेवक विनायक अहंकारी व महालिंग स्वमी यांनी रात्रीच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांची भेट घेऊन कारवाई ची मागणी केली आहे