बायकोच्या जाचाला कंटाळून १० लाख पुरुषांच्या आत्महत्या

0
1740

हुकमत मुलाणी,उस्मानाबाद

मो- 9623261000

उस्मानाबाद – पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याच्या घटना गेल्या कित्येक दिवसांपासून समोर येत आहेत. आपण पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे बर्याच घटनामध्ये उघड झाले होते महिलांकडून आपल्या सुरक्षित कायद्याचा गैरवापर करून पुरूषांना त्रास दिला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१७ या वर्षापर्यंत २१ वर्षात देशभरात तब्बल १० लाख ३३ हजार ९७६ विवाहित पुरूषांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या पत्नीच्या त्रासाला किंवा तिच्या स्वभावाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, २०१५मध्ये देशभरात तब्बल ६४ हजार ५३४ विवाहित पुरूषांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर २०१३, २०१४ साली अनुक्रमे ६५,०९८ आणि ५९,७४४ हजार लग्न झालेल्या पुरूषांनी आपले जीवन संपवले आहे.