पाणी बचतीच्या तळमळीतून मुंडगावच्या शेतमजुराने काढला लघुचित्रपट

0
1870

आकोट/ संतोष विणके – जल है तो कल है… ! आज पाणी वाया जाईल तर उद्या तहान जीव घेईल… ! ही सारी वाक्य काही शब्दांचे बुडबुडे नव्हेत… झपाट्याने कमी होणारा पाणीसाठा दुष्काळ अवर्षण चाराटंचाई हे चित्र पाहिल्यास पाणी बचतीसाठी खडबडून जागे होण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी गावोगावी जलसंधारणाचं तूफान आल असताना मुंडगावच्या एका पाणीदार शेतमजुराने जलजागराच्या चळवळीत स्वतः चित्रपट काढून ग्रामीण भागासह मोठ्या शहरांमध्ये धमाका करून टाकला आहे.

मुंडगाव येथील शेतमजूर अशोक बेलसरे या तरुणाने पाणीबचतीच्या तळमळीतून ग्रामीण भागातील सामान्य जनांमध्ये जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी चक्क चित्रपट काढला आहे. त्याच्या या चित्रपटाचे नाव आहे ” विचार बदला आयुष्य बदलेल”. या चित्रपटात त्याने पाण्याच्या टंचाईमुळे घडणाऱ्या गमतीजमती ,पाण्याचे प्रश्न, पाणी बचतीची गरज आदींवर प्रकाश टाकला आहे विशेष म्हणजे या चित्रपटाचे संपूर्ण मुंडगावातच चित्रीकरण झाले असून सर्व कलाकार मंडळीही गावकरीच आहेत तर चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक पटकथा लेखन अशोक बेलसरे(9423657728) स्वतः आहे

याकामी त्याने कॅमेरा सह इतर यंत्रणा भाड्याने आणून आपला संकल्प पूर्ण केला आहे. त्याच्या या चित्रपटाला लवकरच सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळणार असून त्यासाठी त्याने सेन्सॉर बोर्डाकडे अर्ज देखील केला आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे काही भाग हे अमरावती अकोला पुसद शेगाव यासह विविध शहरातली शाळांमधून दाखवण्यात येत आहेत. पाणी वाचवण्यासाठीच्या तळमळीतून केलेल्या त्यांच्या या कार्यात गावकरी मंडळी मित्रपरिवार व हितचिंतकांनी भक्कम सहकार्य केले आहे.यानिमित्याने ग्रामीण भाग हा चित्रपट कला निर्मितीतही मागं नसल्याचं या उदाहरणामुळे दिसून आले आहे.,

या चित्रपटात विजय ढोरे, प्रकाश कबाळे , रामदास काळे , मोनिका काळे,सौ. सुवर्णा बेलसरे प्रशांत आकोते योगेश भालेराव गणेश कळसकर सिताराम काळे शेख रहमान देवानंद फुसे देवसिंग खटोड वासुदेव लहाने,धिरज नाथे, श्रीकांत गावंडे शंकर यवतकार कु. मनीषा लहाने कु. अंकिता फुसे. कु.तेजस्विनी खलोकार सक्षम काळे,श्रावणी खोकले. सांगोळे, श्याम वानखडे,व बाल कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली .