शेतकर्यांच्या आत्महत्या महाराष्ट्राचा पहिला नंबर

0
1057

हुकमत मुलाणी, उस्मानाबाद

मो-9623261000

उस्मानाबाद –भारतात सर्वात जास्त आत्महत्या करण्याचे प्रमाण महाराष्ट्रात आहे यात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे भारतात सन २०१६ मध्ये शेतकरी व शेतमजूर असे ऐकूण आकरा हजार तीनशे सत्तर जणांनी आत्महत्या केल्या आहेत त्यापैकी तीन हजार सहाशे ऐकसष्ठ (३६६१ )महाराष्ट्रातील होते. ही आकडेवारी सरकारने संसदेत दिली.आहे हि बाब अतिशय गंभीर आहे राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण ब्युरोने (एनसीआरबी) २०१६ साठी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी संबंधित हंगामी माहिती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्य हे दुसर्या क्रमांकावर आहे.तर मध्य प्रदेशचा तीसरा क्रमांक आहे . तेथे २०१६ मध्ये शेतकरी व शेतमजूर मिळून १३२१ आत्महत्या झाल्या आहेत या राज्यांतील आत्महत्या यापेक्षा जास्तही असू शकतात. कारण ही प्राथमीक स्रुपाची आकडेवारी समोर आलेली आहे . यात आकडेवारीत वाढ होऊ शकते शेतकरी आत्महत्येचा विषय संसदेत सदस्यांनी मांडला आहे . त्यात तृणमूल काँग्रेसचे सौगत राय यांच्यासह बर्याच खासदारांचा समावेश होता. एनसीआरबीने दिलेल्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शेतीच्या कामात सक्रिय असलेले ११११ मजूर आणि २५५० शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत . त्यामुळे भारतात सर्वाधिक आत्महत्येची संख्या हि महाराष्ट्रात आसल्याचे धक्कादायक माहिती उघड झाली आहे एनसीआरबीने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये देशात एकूण १२,३६० आणि २०१५ मध्ये १२,६०२ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. महाराष्ट्रापुरते बोलायचे, तर २०१४ मध्ये एकूण ४,००४ शेतकरी आणि शेतमजुरांनी आत्महत्या केली. त्यात १,४३६ शेतमजूर तर २,५६८ शेतकरी होते. २०१५ मध्ये एकूण ४,२९१ शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केली होती. यात शेतकरी ३,०३० तर १,२६१ शेतमजूर होते.