चांदुर बाजार येथे शिक्षक व्यवसायाला काळिमा फासणारी घटना – अल्पवयीन विद्यार्थीनीचा शारीरिक छळाची शक्यता … ?

0
1460

अल्पवयीन विद्यार्थीनीचा शारीरिक छळाची शक्यता; दौ. सी. काळे विद्यालयातील प्रकरण

चांदुर बाजार -बादल डकरे –

पालक शिक्षकांच्या विश्वसावर विद्यार्थ्यांना शाळेत घालतात. परंतु काही नराधम शिक्षक शिक्षकी पेशासोबत आपल्याच शाळेतील विद्यार्थिनींवर कुदृष्टी ठेवतात प्रसंगी अल्पवयीन विद्यार्थिनीच्या शारीरिक छळ करायला ही मागे पुढे पाहत नाही. असाच प्रकार स्थानिक दौ सी काळे विद्यालयात घडला आहे. या शाळेतील एक नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थीनि सोबत हा घाणेरडा प्रकार करून आपल्याच शाळेतील शिक्षकी पेस्याला काळिमा फसली आहे.

हा प्रकार दिनांक 17 ला दुपारी अडीच वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. प्राप्त माहितीनुसार आज शाळेमध्ये घटक चाचणी ची परीक्षा होती. परंतु या घटक चाचणी ला दोन मुली गैरहजर होत्या. त्यामुळे शाळेच्या पर्यावेक्षिका पुसदकर यांनी संबंधित मुलींच्या पालकांना दूरध्वनीवरून संपर्क साधून मुली परीक्षेकरिता का आल्या नाही ? याची चौकशी केली. यावर पालकांनी मुली शाळेतच गेले असल्याचे सांगितले. आपल्या पाल्याची शोध घेण्याकरिता सदर पालक शाळेमध्ये आले असता या दोन्ही मुली त्यांना रस्त्यावरून येत असल्याच्या दिसल्या.
त्या मुलींना विचारणा केली असता शाळेतील शिक्षक संदेश काजळकर यांच्याकडे गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन मुलींमधील एका मुलीने आपल्या पालकांना झालेला प्रकार सांगितला यावरून सदर पालकांसह सदर शिक्षकाचा शोध घेण्या करिता गेले होते. मात्र सदर शिक्षक काजलकर शाळेत नसल्याने पालकांनी शाळेच्या पर्यवेक्षकांना शिक्षकांविषयी जाब विचारला. मात्र पर्यवेक्षक ने शिक्षक रजेवर असल्याचे सांगितले. यामुळे शाळेत काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
त्यामुळे संतापलेल्या पालक व नागरिकांनी शाळेतील इतर शिक्षकांना काही काळ शाळेतील एका खोलीत डांबून ठेवले होते. अखेर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शिक्षकांना मोकळे केले . वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणाची तक्रार प्रक्रिया सुरूच होती. पीडित विद्यार्थिनी मानसिक दबावाखाली असल्याने तिच्याकडून रीतसर तक्रार नोंदवण्यास विलंब होत असल्याने पोलीस प्रशासनही पुढील कार्यवाही करिता हतबल झाले होते.
गुन्ह्याचे गांभीर्य पाहाताउपविभागीय पोलिस अधिकारी अबादगिरे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते. या वेळी पीडित मुलीचे बायन झाल्यावरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणेदार अजय आखरे यांनी सांगितले.