जुगार खेळणाऱ्या ५ जणांवर आकोट ग्रामीण पोलीसांची कारवाई

0
842

आकोट/ प्रतीनीधी-आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनच्या परिसरातील ग्राम दहीखेड शेतशिवारात पठार नदीच्या काठावर जुगार खेळतांना ५ जण मिळुन आले.याठीकाणी पोलीस स्टाफ व पंचासह जुगारावर रेड केली असता रामा खंडारे रवींद्र वैतकर. अक्षय मेंढे शुभम मेंढे, रूपेश तिडके सर्व राहणार वडगाव मेंढे हे 52 पत्त्यावर जुगार खेळताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून बावन पत्ते नगदी 4250 रुपये तीन मोटरसायकल किंमत एक लाख दहा हजार रुपये असा एकूण 1 लाख 14 हजार दोनशे पन्नास रुपयाचा जुगार पंचासमक्ष जप्त करून वरील नमूद आरोपींविरुद्ध कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.सदरची कारवाई सुनील सोनवणे उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांचे मार्गदर्शनाखाली डीबी स्कॉडने केली.