गणेशोत्सव निमित्ताने आकोट शहरात पोलीसांचे पथसंचलन शीघ्र कृती दलासह दंगा काबू पथकाचा समावेश

259

अकोट/संतोष विणके – आकोट शहर हे अतिसंवेदनशील असल्याने आगामी गणेश विसर्जन शांततेत व्हावे म्हणून पोलिस अधीक्षक एम राकेश कला सागर वअकोट उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आज शहरात रूट मार्च केले , ह्यामध्ये मुबई येथुन बंदोबस्त कमी आलेले शीघ्र कृती दल , दंगा काबू पथकाचे 3 तुकड्या, राज्य राखीव दलाची तुकडी व पोलिस स्टेशनचे 50 कर्मचारी अश्या भक्कम पोलिसांच्या ताफ्यासह शहरातुन पथसंचलन करण्यात आले.अकोट शहरातील शिवाजी चौक, सोनू चौक,जयस्तंभचौक, याकूब पटेल, शौकत अली , बरगण, बडा आलवा, केशवराज वेताळ, यात्रा चौक अश्या महत्वाच्या भागात रूट मार्च करून शक्ती प्रदर्शन केले, रूट मार्च च्या पुढे नागरिकांना सूचना देण्यात येऊन अफवा पासून सावध राहण्याचे व काही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात होते.रूट मार्च मध्ये, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे,शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके, ग्रामीण चे मिलिंद कुमार बहाकार, शीघ्र कृती दलाचे अधिकारी सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान शहरात गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त दिसुन येत असल्याने शहर वासीयांच्या मनात समाधान दिसुन येत होते.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।