👉🏻विध्यर्थिनी च्या मौन भूमिकेमुळे प्रकरण संशयास्पद ? 👉🏻दौ. सी.काळे शाळेतील विध्यर्थिनी अपहरण प्रकरण,पोलिसांकडून आरोपीचा शोध

0
1129
Google search engine
Google search engine

👉🏻विध्यर्थिनी च्या मौन भूमिकेमुळे प्रकरण संशयास्पद ?
👉🏻दौ. सी.काळे शाळेतील विध्यर्थिनी अपहरण प्रकरण,पोलिसांकडून आरोपीचा शोध

चांदुर बाजार:-प्रतिनिधी

👉🏻स्थानिक दौ सी काळे विद्यालयातील शिक्षक आणि विध्यर्थिनीच्या शाळा बाह्य प्रकरणात संबधीत विध्यर्थिनी अपहरण प्रकरण उघडकीस आले तेंव्हापासून सदर विद्यार्थिनीने पूर्णतः मौन स्वीकारले आहे. या प्रकरणात पालकांच्या तक्रार वरून संबंधित शिक्षकाच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या प्रकरनि विध्यर्थिनी ने मौन भूमिका स्वीकारली मुळे तसेच विध्यर्थिनी ने स्वतःचे मेडिकल करन्यास स्पस्ट नकार दिल्याने या प्रकरणातील गांभीर्या अधिकच वाढले आहे.
दि .17 सप्टेंबर ला दौ सी काळे शाळेची घटक चाचणी परीक्षा होती. मात्र सदर दोन्ही विध्यर्थिनी शाळेत हजर नव्हात्या. याच दरम्यान ती विद्यार्थ्यांनि आणि तिची मैत्रीण शाळेचे शिक्षक संदेश काजलकर याच्या बोलावण्यावरून त्या शिक्षकाच्या मित्राच्या खोलीवर गेली होती. अशी माहिती सोबत असलेल्या विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितले. या वरून पालक व शाळेतील शिक्षक वाचत काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी समझ्यास्याची भूमिका घेत विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून भा द वि 363 अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपी शिक्षक संदेश काजलकर हा मोर्शी येथील रहिवासी आहे.मग मित्राच्या खोलीवर या अल्पवयीन विध्यर्थिनी ला बोलावण्याची कारण काय? तसेच बोलावलेल्या ठिकाणी गेल्यानंतर दोन पैकी एक विद्यार्थिनीला बाहेर ठेवून पीडित विध्यर्थिनी दार बंद करून तब्बल 30 मिनिट कोणता अभ्यास घेतला? तसेच सादर शिक्षक रजेवर असताना या विद्यर्थिनींना मित्राच्या खोलीवर बोलविण्याचे नेमके कारण काय? त्याच प्रमाणे या शिक्षक याने एकाच मुलीचा अभ्यास कशा घेतला असे बरेच प्रश्न पोलीस समोर अनुत्तरित आहे.या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलिस विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या प्रकरणात खोलीच्या बाहेर असलेल्या दुसऱ्या विध्यर्थिनी ने आपल्या आईला दिलेल्या माहितीवरून हा प्रकार उघड झाला. त्यावरून पीडित मुलीच्या आई ने सुद्धा शाळेकडे धाव घेतली. परंतु ज्या रोषाने इतर पालक शाळेमध्ये दाखल झाले होते. तेवढा रोष संबंधित शिक्षक यांनाच तक्रार दाखल करताना दिसून आला नाही. यावरून पीडित विध्यर्थिनी च्या पालकांची सुद्धा भूमिका संशयास्पद वाटत आहे. तर सदर आरोपी संदेश काजलकर हा अद्यापही पसार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.
त्यामुळे हे प्रकरण पोलिसांनि गंभीरतेने घेतले असून सदर पीडित मुलीला अमरावती येथील बाल सुधार समिती समक्ष चौकशी करीता पाठविण्यात आले आहे. तर या चौकशी अहवालावरून पोलिसांना नवी दिशा मिळणार आहे. या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे यांचा मार्गदर्शनात ठाणेदार अजय आखरे पुढील तपास करीत आहे. मात्र विद्यार्थिनीने चौकशीत पाळलेले मौन, तसेच मेडिकल तपासासाठी करण्यात येत असलेला विरोध यामुळे या प्रकरणी हा तपास कोणत्या दिशेला जाणार याकडे तालुक्यात निरनिराळ्या चर्चेला उधाण आले आहे.

प्रतिक्रिया :-
1)सदर विध्यर्थिनीला अमरावती येथील महिला आणि बाल सुधार केंद्र कडे पाठविण्यात आले आहे. या अहवाल नंतर तपासाची दिशा ठरणार आहे. तर आरोपी अद्यापही फरार असून त्याचा कसून शोध घेणे सुरु आहे. ————-
ठाणेदार अजय आकरे चांदुर बाजार

2)सदर शिक्षका बाबत मिळालेल्या तक्रारी नुसार शिक्षकी कार्याला काळिमा फासणारी आहे . त्या मुळे सदर शिक्षकाला बडतर्फ ची कार्यवाही करण्यात येईल.——– प्रिया चौधरी, अध्यक्ष, दौ सी काळे विद्यालय

3)संबधीत शिक्षक हे रजेवर होते. दोन्ही मुली घटक चाचणीला अनुउपस्थिती होत्या याची माहिती त्याच्या पालकांना देन्यात आली.पालकांच्या तक्रार वरून याची माहिती पोलिसांना देण्यात आली.——–
जयनदा पुसदकर (पर्यवेक्षक)